24 November 2024 11:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Health First | लॅपटॉप मांडीवर ठेवून काम करता? आरोग्याचे हे धोके संभवतात

laptop on thigh health

मुंबई, १४ जून | वर्क फ्रॉम होमचे प्रमाण वाढले आहे. लोक तासनतास लॅपटॉप समोर बसलेले असतात. अनेकदा लॅपटॉप मांडीवर ठेवून अनेक तास काम केले जातेय मात्र तुम्हाला हे माहीत आहे की मांडीवर लॅपटॉप ठेवून काम करणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नव्हे. लॅपटॉपच्या अधिक वापराने तुमच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. तसेच बराच वेळ मांडीवर ठेवून काम केल्यास पुरुषांमध्ये इन्फर्टिलिटीची समस्या सतावू शकते.

लॅपटॉपला जोडलेले वायफाय कनेक्शन तुमच्यासाठी घातक सिद्ध होऊ शकते. अनेक गंभीर आजारांना तुम्ही या निमित्ताने आमंत्रण देता. अशातच लॅपटॉपवर काम करताना काही गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. लॅपटॉप असा मांडीवर ठेऊन काम करणं सोयीस्कर आणि फायदेशीर वाटतं असलं, तरी त्याचे गंभीर दूरगामी परिणाम आरोग्यावर होऊ शकतात. आरोग्यासाठी चुकीच्या असणाऱ्या अनेक पद्धतींमुळे डोकं वर काढणारा कॅन्सर तर डोकेदुखी ठरू शकतोच, मात्र याशिवाय इतरही काही गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं.

त्वचेसाठी धोकादायक:
सातत्याने लॅपटॉपचा वापर केल्यास, तो गरम होतो हे तर आपल्याला माहित आहेच. सतत या उष्णतेचा मारा त्वचेवर होत राहिला, तर ते त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय घटक ठरतं. त्वचेवर रॅशेस येण्याचा धोका संभवतो. यामुळे त्वचेचा रंग कायमचा बदलून जाण्याचा धोकासुद्धा असतो. सतत लॅपटॉप मांडीवर ठेवत असाल, तर नकळतपणे तुम्ही तुमच्या त्वचेची हानी करत आहात. या आजाराला टोस्टेड स्किन सिंड्रोम असं म्हणतात.

पुरुषांसाठी ठरू शकते घातक:
एका रिपोर्टनुसार लॅपटॉपमधून बाहेर पडणारी उष्णता महिलांच्या तुलनेत पुरुषांसाठी अधिक घातक आहे. शरीराची रचना त्यामागचे कारण आहे. गर्भाशय हे महिलांच्या शरीरात असते तर पुरुषांमध्ये अंडकोष हे शरीराच्या बाहेरील भागात असतो. लॅपटॉप मांडीवर घेतल्याने त्यातून निघणारे हिट रेडिएशन हे पुरुषांमधील स्पर्म (शुक्राणू) कमी करु शकतात. याचा परिणाम प्रजनन क्षमतेवर होऊ शकतो. यामुळेच पुरुषांनी आपल्या मांडीवर लॅपटॉप ठेवू नये.

पालकत्व धोक्यात:
कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरण, वापरत असाल तर त्यातून होणाऱ्या रेडिएशन्सचा आरोग्याला नेहमीच धोका असतो. लॅपटॉप सुद्धा वायफायसारख्या सिग्नल्सचा वापर करत असतो. अशावेळी या रेडिएशन्सचा शरीरावर परिणाम होतो. लॅपटॉप सतत मांडीवर असेल, तर पुरुषांचा स्पर्म काउन्ट कमी होणे, स्त्रियांच्या अंडाशयची क्षमता कमी होणे या गोष्टींचा धोका असतो. असं झाल्यास भविष्यात त्याचे गंभीर परिणाम गर्भधारणेवर होऊ शकतात.

कॅन्सरचा धोका:
तंत्रज्ञान विकसित होत असताना, जीवन सुकर करण्याच्या नादात आपण अशा अनेक सवयी लावून घेतल्या आहेत, की ज्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना निमंत्रण मिळत असतं. लॅपटॉप सतत गरम होत असल्याने त्वचेवर त्याचा विपरीत परिणाम होत असतो, हे तर आम्ही तुम्हाला सांगितलंच आहे. त्वचेवर होणार हा गंभीर परिणाम केवळ टोस्टेड स्किन सिंड्रोमपर्यंत सीमित न राहता, त्वचेचा कर्करोग होण्यासाठी सुद्धा कारणीभूत ठरू शकतो.

इतर आरोग्यासंबंधित समस्या:
लॅपटॉप मांडीवर ठेवून काम केल्यास शरीरावर त्वचेसंबंधित त्रास होऊ शकतात. यामुळे शरीराच्या मणक्याचा आकार देखील बदलतो. सर्व्हायकलची समस्याही होण्याची शक्यता असते. दरम्यान, लॅपटॉपवरील वायफाय कनेक्शन हे अधिक घातक असते. त्यामुळे काम झाल्यावर लगेचच वायफाय बंद करा. तसेच नेटवर काम असेल तरच वायफाय ऑन करा.

लॅपटॉपचा वापर करताना शील्डचा वापर जरूर करा. यामुळे लॅपटॉपमधून निघणारे हानिकारक उष्णता आणि रेडिएशनमुळे तुमचा बचाव होऊ शकतो. शील्ड नसल्यास लॅपटॉप कव्हर अथवा इतर गोष्टींचा वापर करू शकता. लॅपटॉपचा वापर करता तो एखाद्या लाकडाच्या टेबलावर अथवा स्टूलवर ठेवा. यामुळे त्यातून निघणारी उष्णता आणि रेडिएशनपासून बचाव होऊ शकतो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

 

News Title: Never keep laptop on thigh during use it will effect on your health news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x