23 November 2024 7:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Health First | कोरोनावर अँटिबॉडी कॉकटेल प्रभावी औषध आलं | एका दिवसात बाधितांमधली लक्षणं गायब

monoclonal antibody cocktail

मुंबई, १४ जून | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर देशातून ओसरतो आहे. अशातच एक चांगली बातमी समोर आली आहे. कोरोनाबाधितांवर मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेलचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. अँटिबॉडी कॉकटेल असलेल्या इंजेक्शनच्या वापरामुळे 24 तासांत कोरोनाची लक्षणे गायब झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

कोरोनाने सारे जग हैराण झाले आहे. कोरोनावर काही औषधं प्रभावी ठरत असल्याचा दावाही केला जातोय. त्यापैकीच अँटिबॉडी कॉकटेलने सर्वांचं लक्ष वेधले आहे. या औषधाचा डोस घेताच पहिल्याच दिवशी कोरोना बाधितांमधली लक्षणं गायब झाल्याचा दावा करण्यात येतोय. हैदराबादमधल्या एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रो-एंट्रॉलॉजीनं 40 रूग्णांवर या औषधाचा प्रयोग केला, आणि तो यशस्वी ठरलाय. भारतात या औषधाची किंमत 70 हजार रूपये इतकी आहे.

मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेलचा एक डोस घेतल्यानंतर 24 तासांत 40हून अधिक कोरोनाबाधितांचा ताप, अस्वस्थता, खोकला यासारखी लक्षणं गायब झाली. हे औषध ब्रिटन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या देशातील कोरोना विषाणूच्या व्हिरिएंटविरोधात उत्तमरीत्या प्रभावी ठरले आहे. आता भारतातल्या डेल्टा व्हेरियंटवरही या औषधाचा प्रभाव दिसून येत आहे.

विशेष म्हणजे सोलापुरातल्या बार्शीतही डॉ. संजय अंधारे यांनीही काही रूग्णांवर मोनोक्लोनल अँटीबॉडिजचा प्रयोग केला आणि कोविड रूग्ण खडखडीत बरे झाले. कोरोनावर मोनोक्लोनल अँटिबॉडी संजीवनीप्रमाणे काम करत असल्याचं दिसतंय. पण त्याचे दर सामान्यांच्या अवाक्याबाहेर आहे. त्यामुळे कमी किंमतीत हे औषध लोकांपर्यंत पोहचावं यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

कोरोनाची सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्या बाधितांमध्ये मोनोक्लोनल अँटिबॉडी थेरपीचा वापर केला जातो. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही गेल्या वर्षी कोरोनाची लागण झाल्यावर याच थेरपीने उपचार घेतले होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

 

News Title: Medicine monoclonal antibody cocktail on coronavirus health news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x