24 November 2024 12:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन FD Calculator | पत्नीच्या नावे FD करून मिळवा जास्तीत जास्त व्याज; FD कॅल्क्युलेटरचा फंडा काय सांगतो पहा - Marathi News
x

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी | भाडेकरू होणार घरमालक

Tenant landlord

पुणे, १५ जून | महानगरपालिकेची मालकी असलेल्या इमारतीत भाडेतत्वावर काही सदनिका देण्यात आल्या आहेत. या सदनिका संबंधित भाडेकरू नागरिकांच्या नावावर करण्यात येणार आहेत. शहर सुधारणा समितीच्या बैठकीत सोमवारी हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात 1 हजार 512 सदनिकांची विक्री करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी प्रत्येकी 12 ते 15 लाख रुपयांदरम्यान ही सदनिका उपलब्ध होणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष आनंद रिठे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शहरातील विविध भागांत रस्ता रुंदीकरण करताना अडथळा ठरणाऱ्या मिळकती पालिकेने ताब्यात घेतल्या. या मिळकतीमध्ये राहत असलेल्या भाडेकरूंचे पुनर्वसन महापालिकेच्या मालकीच्या इमारतीत करण्यात आलेले आहे. प्रति महिना 450 रुपये या दराने पालिका या मिळकतीचे भाडे आकारते. या मिळकती संबंधित भाडेकरूच्या नावावर करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने शहर सुधारणा समितीसमोर ठेवला होता.

पालिकेच्या मुख्य खात्यासह औंध, कोथरूड, वारजे कर्वेनगर, ढोले पाटील रोड आणि हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत या सदनिका भाडेतत्वावर देण्यात आलेल्या आहेत. यातील 1 हजार 81 सदनिका मुख्य खाते, तर 431 सदनिका क्षेत्रीय कार्यालयांच्या आहेत. पालिकेने 1991-92 पासून अशा पद्धतीने भाडे तत्वावर सदनिका दिलेल्या आहेत. ज्या भागात या सदनिका आहेत, तेथील रेडिरेकनरचा दर लक्षात घेऊन याची विक्री केली जाणार आहे. 270 चौरस फूट आकारातील या सदनिका आहेत. शहर सुधारणा समितीने घेतलेल्या या निर्णयामुळे भाडेकरू आता मालक होणार असून सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

भाडेतत्वावर दिलेल्या सदनिकांची विक्री होणार असल्याने पालिकेला महसूल मिळणार आहे. या सदनिकांच्या देखभाल दुरुस्तीसाठी दरवर्षी होणारा पालिकेचा खर्च वाचणार आहे. तसेच या विकलेल्या मिळकतीचा टॅक्‍स जमा होणार असल्याने उत्पन्नाचा स्रोत वाढणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Tenant will be landlord good news for Punekars news updates.

हॅशटॅग्स

#Pune(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x