25 November 2024 5:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी पिक कर्ज योजना | जाणून घ्या कसं मिळणार कर्ज - वाचा सविस्तर

zero interest crop loan scheme

मुंबई, १६ जून | शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तीन लाखापर्यंत बिनव्याजी पिक कर्ज मिळणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी शून्य टक्के व्याजदर आकारला जाणार आहे. व्याज सवलतीमध्ये दोन टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा खूप मोठा फायदा होणार आहे.

पूर्वी मिळत असलेले पिक कर्ज:
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेमध्ये विहित मुदतीत अल्प मुदत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून कर्जावर व्याज सवलत देण्यात येते. या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी विहित मुदतीत कर्ज फेड केले अशा शेतकरी बांधवाना १ लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत व्याज सवलत मिळत होती तर १ लाख ते ३ लाखापर्यंत १ टक्का व्याज सवलत बिनव्याजी पिक कर्ज योजनेतून देण्यात येत होती.

बिनव्याजी पिक कर्ज देण्याचा मंत्रीमंडळाचा निर्णय:
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेमध्ये आता ज्या शेतकरी बांधवानी १ लाख ते ३ रुपये कर्ज मर्यादेपर्यंत विहित विहित मुदतीमध्ये परतफेड केल्यास अधिक २ टक्के व्याज सवलत मिळणार आहे असा निर्णय मंत्रीमंडळाने घेतलेला आहे.

असे मिळणार शेतकऱ्यांना पिक कर्ज:
३ लाख रुपये मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना राज्य शासनामार्फत ३ टक्के व्याज सवलत मिळेल व केंद्रामार्फत देखील ३ टक्के व्याज सवलत मिळणार आहे फक्त आत एकच आहे कि शेतकऱ्यांनी विहित मुदतीत अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड केलेली असावी. राज्य शासनाकडून ३ टक्के व केंद्रशासनाकडून ३ टक्के असे एकूण ६ टक्के व्याज सवलत शेतकरी बांधवाना मिळणार आहे म्हणजेच आता २०२१-२२ या वर्षापासून शेतकऱ्यांना हे कर्ज शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळणार आहे.

बिनव्याजी पिक कर्ज योजनेमुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी होणार मदत:
ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग पेरणीच्या तयारीला लागलेला आहे. बी-बियाणे व शेतीसाठी खते खरेदी करण्याची घाई शेतकरी बांधवांना लागलेली आहे. पेरणीसाठी शेतकरी नेहमी पैशांच्या विवंचनेत असतो आणि त्यातच आता तीन लाखापर्यंत बिनव्याजी पिक कर्ज मिळणार असल्याची घोषणा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी त्यांच्या ट्वीटरच्या माध्यमातून दिलेली आहे. यामुळे शेतकरी बांधवांमध्ये कमालीचा आनंद व्यक्त केला जात आहे.

बिनव्याजी पिक कर्ज योजना उद्देश:
बिनव्याजी कर्ज योजनेमुळे शेतकरी बांधवांना शेतीसाठी लागणारे बी-बियाणे खरेदी करता येईल त्यामुळे त्यांच्या शेती उत्पादनात वाढ होईल. बिनव्याजी कर्ज मिळत असल्यामुळे शेतकरी विहित मुदतीमध्ये या कर्जाची परतफेड करतील यातून बँकाची वसुली वाढेल यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. या संदर्भातील माहिती शासनच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Maharashtra state zero interest crop loan scheme for farmers news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x