25 November 2024 3:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

माजी एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांची NIA कडून चौकशी | अटकेची शक्यता

Pradeep Sharma

मुंबई, १७ जून | अँटीलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन मर्डर केसमध्ये बुधवारी नॅशनल इंवेस्टिगेशन एजंसी (NIA) ने माजी ACP एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांना ताब्यात घेतले आहे. शर्माच्या घरी बुधवारी सकाळी छापेमारी करत NIA ने चौकशी सुरू केली आहे. एनआयए प्रदीप शर्मा आणि निलंबित API सचिन वझे आणि माजी कॉन्स्टेबल विनायक शिंदे यांच्यातील संबंधांचा तपास करत आहे.

अनेक दिवसांपासून प्रदीप शर्मा एनआयएच्या रडारवर होते. गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून प्रदीप शर्मांच्या घरी छापेमारी करत एनआयएने त्यांना ताब्यात घेतले. सध्या राज्य राखीव दलाचे पथक शर्मांच्या घराबाहेर तैनात करण्यात आले आहे. प्रदीप शर्मा यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शर्मा NIA च्या रडारवर का आले ?
सूत्रांनी सांगितल्यानुसार, NIA कडे प्रदीप शर्मा आणि सचिन वझेच्या मीटिंगची माहिती आहे. तपासादरम्यान एनआयएला माहिती मिळालीये की, मनसुख हिरेनच्या खूनाच्या काही दिवसांपूर्वी वझेने अंधेरी परिसरात एका व्यक्तीची भेट घेतली होती. प्रदीप शर्मा त्याच भागात राहतात. वझे आणि शर्माची भेट झाल्याचा एनआयएला संशय आहे. एका CCTV फुटेजमध्ये वझे आणि शिंदे वांद्रे-वरळी सी लिंकवर कारमध्ये बसलेले दिसत आहेत. ते दोघे शर्माला भेटण्यासाठी जात असल्याचा संशय आहे. मनसुखला ज्या नंबरवरुन कॉल करुन बोलवण्यात आले होते, त्या नंबरचे शेवटचे लोकेशनही अंधेरीतील जेबी नगर होते.

NIA ला शर्माकडून काह माहिती हवीये ?
शर्मा आणि वझेची अखेरची भेट कधी झाली ? नोकरी सोडल्यानंतर शर्मा वझेच्या संपर्क होता का ? शर्मा-वझे-शिंदेची मीटिंग झाली का ? वझे आणि शिंदेने मनसुख हिरेनबाबत काही सांगितलं होतं का ? या प्रश्नांची उत्तरे एनआयएला शर्माकडून हवी आहेत.

वझे आणि शर्मामध्ये काय संबंध ?
2007 मध्ये निलंबित झाल्यानंतर वझेने शिवसेनेत प्रवेश केला होता. शर्माला शिवसेनेत एंट्री मिळण्याचे कारण वझेच आहे. पंरतु, 2008 नंतर वझेचे सदस्यत्व रिनीव्ह केले नसल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. प्रदीप शर्माला वझेचा गुरु मानले जाते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Mumbai Police former officer Encounter Specialist Pradeep Sharma detained by NIA for enquiry news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x