22 November 2024 9:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

CBSE 12वी रिजल्टचा फॉर्मूला | सुप्रीम कोर्टात रिपोर्ट सादर | या आधारे ठरणार निकाल

CBSE Board 12th

मुंबई, १७ जून | CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल तयार करण्यासाठी बनलेल्या 13 सदस्यांच्या कमेटीने गुरुवारी सुप्रीम कोर्टात आपली रिपोर्ट सादर केली. यात बोर्डाने निकाल कोणत्या आधारावर जाहीर केला जाईल, याबाबत माहिती दिली आहे. 12 वीचा निकाल 10वी, 11वीचा अंतिम निकाल आणि 12वीच्या प्री-बोर्डाच्या निकालावर ठरवला जाणर आहे. सर्व गोष्टी सुरळीत झाल्यास, 31 जुलैपर्यंत निकाल जाहीर केला जाऊ शकतो.

CBSE च्या कमेटीने पुढे सांगितले की, 10वीच्या 5 पैकी सर्वाधिक मार्क असलेल्या तीन विषयांना घेतले जाईल. तसेच, 11वीच्या पाच विषयांचे सरासरी गुण घेतले जातील आणि 12वी प्री-बोर्डाच्या प्रॅक्टिकलचे मार्ग ग्राह्य धरले जातील. 10वी आणि 11वीच्या गुणांना 30-30% आणि 12वीच्या गुणांना 40% वेटेज असेल. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची असेल, त्यांच्यासाठी नंतर वेगळी व्यवस्था केली जाईल.

30:30:40 फॉर्मूलावर पॅनलचे 3 वितर्क:

1. पॅनलच्या सदस्याने सांगितले की, आम्ही केंद्राच्या नवोदय विद्यालय, CBSE आणि इतर शाळांशी चर्चा केली. त्यातून समजले की, यंदाची बॅच पूर्णपणे ऑनलाइन होती.

2. अशा परिस्थितीत फक्त 12 वीच्या प्री बोर्डाच्या आधारे निकाल लावणे योग्य ठरणार नाही. त्यामुळेच 10वी आणि 11वीच्या गुणांचाही या निकालात समावेश करण्यात आला आहे.

3. कमेटी 12वीच्या गुणांना जास्त वेटेज देण्याच्या विचारात आहे. पण, सर्वांच्या विचारानंतर 10वी-11वीला 30-30% आणि 12वीला 40% वेटेज देण्यावर सहमती बनू शकते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: CBSE Board 12th result Supreme Court Evaluation Formula 12th result news updates.

हॅशटॅग्स

#Education(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x