उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी हिंदू-मुस्लिम दंगे भडकवले जातील - प्रकाश आंबेडकर
मुंबई, १७ जून | कोरोनाकाळात नागरिकांना सोयी सुविधा देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरली आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी हिंदू-मुस्लिम दंगे भडकवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाईल, असा अंदाज वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. देशात दंगे होऊ नयेत यासाठी केंद्र आणि राज्य सरकराने ‘प्रॉफिट मोहम्मद अँड अदर रिलिजियस हेड्स प्रोहायबीशन ऑफ स्ल्यानंडर ऍक्ट, 2021 कायदा’ मंजूर करावा, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. हा कायदा विधानसभा, संसदेत मांडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना स्वातंत्र्योतर काळात भारतीय समाज लहान मोठ्या अशा बऱ्याच जातीय दंगलींचा साक्षीदार राहिला आहे. ज्यामध्ये अनेक माणसांचे बळी गेले. हिंदू, मुस्लिम, शीख, पारशी व बौद्धांना जागरूकता आल्याने अनेक जीव घेतलेल्या सांप्रदायिक दंग्यांमागील कार्यपद्धती आता जनतेला समजली आहे.
मंदिर-मस्जिदमध्ये मांस फेकणे, चिथावणीखोर आणि आक्षेपार्ह भाषा वापरून जमावाची माथी भडकावणे, खोटे आरोप करून एकमेकांवर हल्ले करवणे, अफवा पसरवणे या सगळ्या क्लुप्त्या दंगली घडवून आणणाऱ्या समाजविघातक संघटनाचेच कारस्थान असते. हे आता समाजाच्या लक्षात आले आहे. जेव्हा ही सगळी कारस्थाने अपयशी ठरतात तेव्हा बॉम्बस्फोट आणि मॉब लिन्चींग सारखी कृत्य केली जातील. त्याच प्रमाणे मुझफ्फरपुर येथे केलेला प्रयत्न देखील फसलेला असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
सध्याच्या सरकारचे सर्व आघाड्यावरील अपयश आता सर्वांसमोर आले आहे. आता आम्ही सजलो आहोत की मुस्लिम आणि इतर धार्मिक समुहांच्या भावना उचकवण्यासाठी भावनिक आणि धार्मिक डावपेच वापरले जातील. आत्ता काही संघटनांकडून भावनिक व धार्मिक मुद्यांना हात घातला जाईल. पवित्र कुराण, पैगंबर मोहम्मद सल्ललाहू अलैहीवस्सल आणि इतर धार्मिक गुरू अथवा व्यक्तीमत्वांच्या संदर्भाने निंदनीय व आक्षेपार्ह भाषा वापरून समाजाला चिथावले जाईल व देशात दंगलीच वातावरण तयार केल जाईल, असे आमचे मत असल्याचे आंबेडकर म्हणाले. या परिस्थितीबाबत विचार केल्यास देशात धार्मिक, सामजिक आणि वांशिक भावना कलुषित करण्याचे काम केल जावू नये म्हणून आम्ही या कायद्याचा प्रस्ताव मांडत आहोत. येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या संसद व महाराष्ट्र विधानसभेच्या दोन्ही सदनांच्या अधिवेशनात हे बिल मांडले जाईल. याची दक्षता घेणे ही आमची जबाबदारी असेल, असे आंबेडकर यांनी संगितले.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.
News Title: VBA leader Prakash Ambedkar criticism on Modi government in Mumbai news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार