22 November 2024 9:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी हिंदू-मुस्लिम दंगे भडकवले जातील - प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar

मुंबई, १७ जून | कोरोनाकाळात नागरिकांना सोयी सुविधा देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरली आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी हिंदू-मुस्लिम दंगे भडकवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाईल, असा अंदाज वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‌ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. देशात दंगे होऊ नयेत यासाठी केंद्र आणि राज्य सरकराने ‘प्रॉफिट मोहम्मद अँड अदर रिलिजियस हेड्स प्रोहायबीशन ऑफ स्ल्यानंडर ऍक्ट, 2021 कायदा’ मंजूर करावा, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. हा कायदा विधानसभा, संसदेत मांडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना स्वातंत्र्योतर काळात भारतीय समाज लहान मोठ्या अशा बऱ्याच जातीय दंगलींचा साक्षीदार राहिला आहे. ज्यामध्ये अनेक माणसांचे बळी गेले. हिंदू, मुस्लिम, शीख, पारशी व बौद्धांना जागरूकता आल्याने अनेक जीव घेतलेल्या सांप्रदायिक दंग्यांमागील कार्यपद्धती आता जनतेला समजली आहे.

मंदिर-मस्जिदमध्ये मांस फेकणे, चिथावणीखोर आणि आक्षेपार्ह भाषा वापरून जमावाची माथी भडकावणे, खोटे आरोप करून एकमेकांवर हल्ले करवणे, अफवा पसरवणे या सगळ्या क्लुप्त्या दंगली घडवून आणणाऱ्या समाजविघातक संघटनाचेच कारस्थान असते. हे आता समाजाच्या लक्षात आले आहे. जेव्हा ही सगळी कारस्थाने अपयशी ठरतात तेव्हा बॉम्बस्फोट आणि मॉब लिन्चींग सारखी कृत्य केली जातील. त्याच प्रमाणे मुझफ्फरपुर येथे केलेला प्रयत्न देखील फसलेला असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

सध्याच्या सरकारचे सर्व आघाड्यावरील अपयश आता सर्वांसमोर आले आहे. आता आम्ही सजलो आहोत की मुस्लिम आणि इतर धार्मिक समुहांच्या भावना उचकवण्यासाठी भावनिक आणि धार्मिक डावपेच वापरले जातील. आत्ता काही संघटनांकडून भावनिक व धार्मिक मुद्यांना हात घातला जाईल. पवित्र कुराण, पैगंबर मोहम्मद सल्ललाहू अलैहीवस्सल आणि इतर धार्मिक गुरू अथवा व्यक्तीमत्वांच्या संदर्भाने निंदनीय व आक्षेपार्ह भाषा वापरून समाजाला चिथावले जाईल व देशात दंगलीच वातावरण तयार केल जाईल, असे आमचे मत असल्याचे आंबेडकर म्हणाले. या परिस्थितीबाबत विचार केल्यास देशात धार्मिक, सामजिक आणि वांशिक भावना कलुषित करण्याचे काम केल जावू नये म्हणून आम्ही या कायद्याचा प्रस्ताव मांडत आहोत. येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या संसद व महाराष्ट्र विधानसभेच्या दोन्ही सदनांच्या अधिवेशनात हे बिल मांडले जाईल. याची दक्षता घेणे ही आमची जबाबदारी असेल, असे आंबेडकर यांनी संगितले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: VBA leader Prakash Ambedkar criticism on Modi government in Mumbai news updates.

हॅशटॅग्स

#Prakash Ambedkar(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x