13 November 2024 1:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | BHEL शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: BHEL Penny Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय 11 रुपयाचा शेअर, 5 दिवसात दिला 84% परतावा, रोज अप्पर सर्किट - Penny Stocks 2024 Yes Bank Share Price | येस बँक शेअर 20 रुपयांच्या खाली घसरला, स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठे संकेत - NSE: YESBANK Vodafone Idea Share Price | व्होडाफोन-आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA PPO Number Online | तुमच्याकडे PPO नंबर आहे का, अन्यथा तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, असा जाणून घ्या - Marathi News Salary Account Facility | खूप कमी पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात 'या' जबरदस्त मोफत सुविधा, लक्षात ठेवा IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, स्टॉक प्राईस घसरतेय, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB
x

पृथ्वीराज चित्रपटाच्या टायटलवरून वाद | अक्षय कुमारचा पुतळा जाळून संताप

Akshay Kumar

चंदिगढ, १८ जून | बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचा आगामी चित्रपट पृथ्वीराज सध्या चांगलाच अडचणीत आला आहे. यशराज फिल्म्स निर्मित ‘पृथ्वीराज ‘या चित्रपटाला चंदिगढमध्ये भयंकर विरोधास सामोरे जावे लागत आहे. दरम्यान क्षत्रिय महासभेने या चित्रपटाच्या नावास कडकडून विरोध करीत त्यावर आक्षेप घेतला आहे. जोधा-अकबर, पद्मावत सारख्या चित्रपटांच्या नांवांविषयीचा वाद तुम्हाला माहीत असेलच. तर आता अशाच प्रकारचा आणखी एक वाद पुन्हा एकदा उदभवण्याची शक्यता आहे. अक्षय कुमार आणि यशराज फिल्म्स निर्मित ‘पृथ्वीराज’ या चित्रपटावर आता या संघटनेने प्रश्न उठविले आहेत आणि नव्या वादाचा पायंडा घातला आहे. इतकेच नव्हे तर अक्षय कुमारचा पुतळा जाळून ठिणगी टाकण्यात आली आहे.

पंजाबमधील चंदिगढमध्ये अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या उपस्थितीत ‘पृथ्वीराज’ या आगामी बॉलिवूड चित्रपटाविरोधात जोरदार प्रदर्शन करण्यात आली आहेत. यावेळी अक्षय कुमारचा पुतळा बनवून आणलेला होता. शिवाय संतप्त विरोधकांनी अक्षय कुमारचा पुतळा जाळला आहे आणि आपला विरोध दर्शविला आहे. संघटनेच्या लोकांची मागणी अशी आहे की, चित्रपटाचे ‘पृथ्वीराज’ हे नाव बदलून ‘हिंदू सम्राट पृथ्वीराज चौहान’ असे करण्यात यावे. कारण पृथ्वीराज चौहान हे शेवटचे हिंदू सम्राट होते. त्यामुळे त्यांचे नाव हे सन्मानपूर्वकच घेतले पाहिजे.

दरम्यान या संघटनेची आणखी एक मागणी आहे की, चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदर हा चित्रपट एकदा राजपूत आणि क्षत्रिय समाज प्रतिनिधींना दाखवायला हवा, म्हणजे त्यांना चित्रपटात काही विवादास्पद आहे का ते आधीच समजेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x