22 November 2024 2:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

कर्नाटकात भाजपचं सरकार असल्याने फडणवीसांनी ते प्रयत्नच केले नाहीत | पण जयंतरावांनी केले

Almatti Dam Water

बंगळुरू, १९ जून | पावसाळ्यात पुराच्या पाण्याने पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूरला नेहमीच अलमट्टी आणि हिप्परगा धरणातील पाण्याचा त्रास सहन करावा लागतो. फडणवीस मुख्यमंत्री असताना याच भागात महापुरामुळे अनेक कुटुंब बेघर झाली होती, तर अनेकांनी प्राण गमावले होते. मात्र भारतीय जनता पक्षाचं सरकार असल्याने फडणवीसांनी नेहमीच गुळगुळीत भूमिका घेतली होती. तसेच कडक भूमिका किंवा संवाद साधून प्रश्न निकाली काढण्यासाठी कधीच प्रयत्न केले नव्हेते. कायदेशीर बाब पुढे करून केवळ बचावात्मक भुमीका मांडल्याचे महाराष्ट्रानं पाहिलं आहे. मात्र सध्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मात्र थेट कर्नाटकात जाऊन संवाद सुरु केल्याने प्रश्न निकाली लागण्याची आशा निर्माण झाली आहे.

पश्चिम महाराष्ट्र आणि विशेषत: सांगली, कोल्हापूरमधील महापुराचं संकट टाळण्यासाठी, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील कर्नाटकसोबत वाटाघाटी करत आहेत. त्यांनी आज कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची भेट घेतली. अलमट्टी आणि हिप्परगा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यास सांगली-कोल्हापूरमधील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांमधील पाण्याची पातळी घटेल, त्यामुळे महापुराचं संकट टळेल.

त्या अनुषंगानेच महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि मंत्री स्तरावर कर्नाटकातील बंगळुरुत बैठक होत आहे. या बैठकीला कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा आणि महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील उपस्थित आहेत. पूर नियंत्रणाच्या दृष्टीने महत्त्वाची चर्चा करुन, महापुराचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Maharashtra Water Resources Minister Jayant Patil Meeting with Karnataka CM B S Yediyurappa over flood from Krishna river Almatti Dam Water news updates.

हॅशटॅग्स

#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x