22 November 2024 10:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS
x

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ | भाजपमध्ये योगी आदित्यनाथ यांना पर्यायी चेहऱ्याचा शोध

Uttar Pradesh Assembly Election 2022

लखनऊ, २१ जून | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व्हेसर्वा शरद पवार यांनी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आगामी लोकसभेसाठी त्यांनी विरोधकांची मुठ बांधणे सुरू केले आहे. याच पार्श्वभूमीवर पवारांनी सोमवारी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतली आणि त्यानंतर मंगळवारी दुपारी 4 वाजता ‘राष्ट्र मंच’ची बैठक बोलावली आहे. मोदी सरकारच्या विरोधात 2018 मध्ये यशवंत सिन्हा यांनी राष्ट्र मंचची सुरुवात केली होती.

शरद पवार पहिल्यांदाच राष्ट्र मंचच्या बैठकीत सहभाग घेणार आहेत. सध्या हा मंच राजकीय नाही, पण भविष्यात यातून तिसरी आघाडी तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी, शरद पवारांनी 15 दिवसांत दुसऱ्यांना निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतली आहे. 11 जूनला प्रशांत किशोर यांनी शरद प पवार यांच्या मुंबईतील घरी भेट घेतली होती. दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली होती. त्या भेटीकडे 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात शरद पवार सर्व विरोधकांना एकत्र आणत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

एकाबाजूला दिल्लीत जोरदार राजकीय घडामोडी घडत असताना दुसरीकडे उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक वृत्त आलं आहे. त्यामुळे भाजपाला आगामी म्हणजे उत्तर प्रदेशातील २०२२ मधील विधानसभा निवडणुकीत पराभवाची भीती सतावते आहे असं म्हटलं जातंय. त्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथ यांच्या ऐवजी दुसरा चेहरा समोर आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत असंच म्हणावं लागेल.

कारण सध्याचे योगी सरकारमधील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनीच तसे धक्कादायक विधान केलं आहे. स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले की, उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीतील वरिष्ठ नेते नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करतील असं म्हटलं आहे. याबाबत पीटीआयएन वृत्त आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की पोहचावा.

News Title: Uttar Pradesh Assembly Election 2022 BJP considering about another face for Chief minister post news updates.

हॅशटॅग्स

#UttarPradeshAssemblyElection2022(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x