24 November 2024 2:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
x

‘डी’कोल्ड व सॅरिडॉनसह ३४३ औषधांवर लवकरच बंदी?

नवी दिल्ली – ‘डी’कोल्ड आणि सॅरिडॉनसह ३४३ औषधांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून लवकरच बंदी येण्याची शक्यता आहे. सर्वाधिक वेदनाशामक तसेच फ्लू’शी संबंधित औषधांवर बंदी येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. कारण ही औषधे ‘फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन’ औषधे आहेत असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. या औषधांवर बंदी घातली जावी म्हणून एका केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका उपसमितीने शिफारस केली होती. ही शिफारस मान्य करून या औषधांवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.

कोणत्याही आजारावर उपचार म्हणून वापरण्यात येणारी औषधे जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त प्रकार एकत्र करून तयार केली जातात. त्यामुळे ते औषध घेण्याची मात्रा ठरलेली असते. त्यामुळेच अशा औषधांना फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन असे म्हटले जाते. केंद्र सरकारनं या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास फेंसेडिल, सॅरिडॉन, डी कोल्ड टोटलसारखे कफ सिरप आणि पेन किलरवर बंदी येईल असं वाटत आहे.

सरकारने या औषधांवर बंदी घातल्यास त्याचा एबॉटसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांसह पिरामल, मॅक्लिऑड्स, सिप्ला आणि ल्युपिनसारख्या राष्ट्रीय कंपन्यांच्या व्यवसायाला फटका बसणार आहे. सरकारने बंदीचा निर्णय जाहीर केल्यास त्याविरोधात या कंपन्या न्यायालयात धाव घेऊ शकतात.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x