23 November 2024 1:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

अमरनाथ यात्रा रद्द करणारी भाजपा पंढरपूरच्या वारीसाठी आग्रही | त्यांना वारकऱ्यांच्या जीवाशी घेणंदेणं नाही - काँग्रेस

Amarnath Yatra cancelled 2021

मुंबई, २२ जून | देशात पसरलेल्या कोरोना महामारीमुळे सलग दुसऱ्या वर्षी अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. ही यात्रा 28 जून ते 22 ऑगस्टपर्यंत होणार होती. मधल्या काळात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यामुळे श्राइन बोर्डाने अमरनाथ यात्रेच्या तारखा जाहीर केल्या होत्या. 1 एप्रिलपासून यात्रेचे अॅडवांस रजिस्ट्रेशनदेखील सुरू झाले होते. पण, कोरोनाची दुसरी लाट आली आणि यामुळे यात्रा रद्द करावी लागली. पण, भाविकांना ऑनलाइन दर्शन करता येणार आहे.

जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सोमवारी सांगितले की, वाढत्या कोरोना संसर्गामुळे यंदाही अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे 2020 मध्येही ही यात्रा रद्द केली होती. तसेच, 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये कलम-370 रद्द केल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव यात्रा मध्येच थांबवण्यात आली होती.

दरम्यान, याच विषयाला अनुसरून आणि पंढरपूरच्या वारीवरून राजकारण करणाऱ्या भाजपाला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी लक्ष केलं आहे. यासंदर्भात ट्विट करताना सचिन सावंत यांनी म्हटलंय की, “अमरनाथ यात्रा रद्द करणारी भाजपा पंढरपूरच्या वारीसाठी आग्रह धरत आहे. दुटप्पीपणा तो हा! धारकऱ्यांच्या पाठिराख्या भाजपाला वारीशी व वारकऱ्यांच्या जीवाशी घेणंदेणं नाही. फक्त हीन पातळीचे राजकारण करायचे आहे. हिंमत असेल तर मोदींविरुद्ध बोला. कुठे गेले ते अध्यात्मिक आघाडीचे थोतांड?

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की पोहचावा.

News Title: Amarnath Yatra cancelled 2021 amid India coronavirus crisis congress criticized news updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x