2 January 2025 10:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | डोळे झाकून गुंतवणूक करा SBI च्या या फंडात, महिना 4000 SIP वर मिळेल 30,36,592 रुपये परतावा Horoscope Today | आज अनेकांचे मन आनंदी आणि आशावादी असेल तर, काहींचे कार्यक्षेत्र वाढेल, यामधील तुमची रास कोणती Jio Finance Share Price | जिओजित फायनान्शियल शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेजचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: JIOFIN HDFC Mutual Fund | बिनधास्त SIP करा या योजनेत, 2000 रुपयांच्या बचतीवर कोटींच्या घरात परतावा मिळेल, फंडाविषयी जाणून घ्या Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा Penny Stocks | 1 रुपया 80 पैशाचा पेनी शेअर, 847 टक्के परतावा दिला, अपडेट नोट करा - Penny Stocks 2025 Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: SUZLON
x

जिल्हा परिषद निवडणुकांवरून भाजपमध्ये गोंधळ? | फडणवीस OBC उमेदवार देणार तर पंकजा न्यायालयात जाणार

OBC quota

मुंबई, २३ जून | पावसाळी अधिवेशनाचा कालावधी, विधानसभा अध्यक्ष निवडणूक, ओबीसी आरक्षण आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी जिल्हा परिषद निवडणुका घेण्याचाच सरकारचा डाव असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीत भाजप फक्त ओबीसी उमेदवारच देईल, मग विजय किंवा पराजय जे होईल ते आम्ही पाहून घेऊ, असा आक्रमक पवित्रा फडणवीस यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं.

राज्यपालांची भेट घेतल्यानंतर फडणवीस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी त्यांनी राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या मुद्द्यावरुन आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलं. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाल्याशिवाय राज्यात कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही, अशी भूमिका भाजप नेत्यांनी यापूर्वीच व्यक्त केली आहे. त्यानंतर मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही ओबीसीचा मुद्दा सुटल्याशिवाय निवडणुका होणार नाहीत असं जाहीर केलं होतं. मात्र, वडेट्टीवार यांनी घोषणा केल्याच्या दुसऱ्याच दिवशी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. या मुद्द्यावर आता भाजप अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

दुसरीकडे, भाजपच्या पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणं हे समाजासाठी धक्कादायक असल्याचं म्हटंल आहे. तसंच, ओबीसींचा इम्पिरिकल डाटा मिळत नसेल तर ओबीसी आरक्षणाशिवाय होणाऱ्या निवडणुका राज्य सरकारने रद्द कराव्यात असा सल्ला देखील पंकजा मुंडे यांनी दिला.

पंकजा मुंडे यांनी निवडणुकांच्या मुद्द्यावरुन पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाकडे सरकारचं अक्षम्य दुर्लक्ष आहे, अशी टीका मुंडेनी राज्य सरकारवर केली. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणं हे समाजासाठी धक्कादायक असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. या निर्णयाबद्दल न्यायालयात दाद मागणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. सरकार समाजाचा इम्पिरिकल डाटा नाही म्हणून आरक्षण देणं टाळत आहे. सरकारने हा डाटा मिळवण्यासाठी विशेष कृती दल म्हणजे टास्क फोर्सची स्थापना करावी अशी मागणीही पंकजा मुंडे यावेळी केली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: BJP stand after OBC quota in Zilla Parishad by poll elections in states news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x