22 November 2024 9:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

पीडित पुरुष | पुढच्या जन्मी अशी बायको नको रे बाबा | पुरुषांनी चक्क पिंपळाच्या झाडाची केली पूजा

Pooja of Peepal tree

औरंगाबाद, 24 जून | बायकोच्या जाचाला कंटाळलेल्या पुरुषांनी, माझ्या बायकोसोबत आणखी जन्म देऊ नको, अशी प्रार्थना केली. बुधवार (दि 23) वाळूज परिसरातील पत्नी पीडित पुरुष आश्रमात, संघटनेच्या वतीने पिंपळाच्या झाडाचे पूजन करत महिलांप्रमाणे पुरुषांसाठी देखील कायदे करण्याची मागणी करण्यात आली.

वट सावित्रीच्या आदल्या दिवशी पिंपळाच्या झाडाचे पूजन:
बुधवारी वट सावित्री पौर्णिमा आहे. या दिवशी बायका वट वृक्षाची पूजा करून सात जन्म आम्हाला हाच नवरा मिळावा, अशी प्रार्थना करतात. मात्र, बायकोची इच्छा पूर्ण करू नको यासाठी वटपौर्णिमेच्या एक दिवस अगोदर पुरुषांनी यमराजाला व मुंजाला साकडे घातले आहे की, हे यमराजा आमच्या बायकांनी आम्हाला इतका त्रास दिला आहे की अशा बायकांबरोबर सात जन्म काय सात सेकंद देखील संसार करू शकत नाहीत. आमच्या बायकांनी आमच्या कुटुंबाचा छळ करून असह्य वेदना दिल्या आहेत. अशा बायका उद्या सावित्रीप्रमाणे वट वृक्षाची पूजा करून यमराजाला साकडे घालतील. ते साकडे न्यायोचित नाही व योग्य नाही म्हणून आमच्या पत्नीचे उद्या काही एक म्हणणे ऐकू नकोस. व आम्हाला अशा प्रकारच्या बायका देण्यापेक्षा कायमस्वरुपी मुंजा (अविवाहित) ठेव, अशी मनोकामना यावेळी संघटनेतील पुरुषांनी केली.

महिलांप्रमाणे पुरुषांसाठी कायदे करण्याची मागणी:
पुरुषांच्या बाजूने कायदे नसून महिलांना कायद्याचे झुकते माप असल्याने अनेक महिला कायद्याचा गैरवापर करत पुरुषांवर अन्याय करीत आहेत. त्यामुळे, पुरुषांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन पुरुषांसाठी पुरुष आयोग स्थापन करावा आणि पुरुषांचे बळी घेणे थांबवावे, अशी मागणी असून, आम्ही शासनास वारंवार निवेदन दिले, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे, मुंजाला साकडे घालत असून या वर्षीची पत्नी पीडित पुरुष आश्रम येथे पाचवी पिंपळ पौर्णिमा साजरी केल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष भारत फुलारे यांनी दिली. या पूजनात अ‌ॅड. दासोपंत दहिफळे, चरणसिंग घुसिंगे, वैभव घोळवे, भिकन चंदन, जगदीश शिंदे आदी उपस्थित होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Aurangabad men did Pooja of Peepal tree on the occasion of Vat Savitri Pooja news updates.

हॅशटॅग्स

#FestivalofUnity(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x