22 November 2024 6:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे
x

भाजपचे सरकार असताना प्रश्न का सोडवला नाही? | संतप्त शिवसैनिकांचा मेटेंच्या शिवसंग्रामच्या बैठकीत राडा

Shivsangram Vinayak Mete

औरंगाबाद, २४ जून | शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे बैठक सुरु होती. मात्र, या बैठकीत अचानक गदारोळ सुरु झाला. काही तरुण अचानक बैठकीत आले. त्यांनी जोरजोरात आरडाओरड करायला सुरुवात केली. ते विनायक मेटे यांच्याजवळ आले. भाजप सरकार असताना प्रश्न का सोडवला नाही? असा सवाल या तरुणांनी केला. या तरुणांनी ही बैठक उधळून लावली.

यावेळी सभेत उपस्थित असलेले इतर नागरिक शांतपणे सर्व प्रकार बघत राहिले. विशेष म्हणजे विनायक मेटे यांच्यासमोर हा सर्व प्रकार घडला. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर कार्यकर्त्यांनी आक्रमक कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने संबंधित प्रकार निवाळण्यात आला.

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या उपस्थितीत औरंगाबादेत आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. संबंधित बैठक ही शिवसंग्रामच्या मेळाव्या संदर्भात सुरु होती. या बैठकीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याची माहिती समोर येत आहे. औरंगाबाद शहरातील पडेगाव येथे शिवसंग्रामची बैठक सुरु होती. पण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत घुसून बैठक बंद पाडली. भाजपचे सरकार असताना प्रश्न का सोडवला नाही? असा प्रश्न विचारत शिवसैनिकांनी बैठकीत गोंधळ घातला. पोलिसांनी योग्यवेळी घटनास्थळी येऊन मध्यस्थी केली. त्यानंतर विनायक मेटे देखील गाडीत बसून निघून गेले. या घटनेचे फोटो आता समोर आले आहेत

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Shivsena party workers create ruckus at Shivsangram Vinayak Mete meeting in Aurangabad news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x