22 April 2025 5:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Health First | दह्यासोबत चुकूनही खाऊ नका ‘या’ गोष्टी | अन्यथा होईल प्रचंड त्रास - वाचा सविस्तर

Avoid eating with curd

मुंबई, २४ जून | उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीरात थंडावा निर्माण होण्यासाठी आहरात अनेकजण दह्याचा समावेश करतात. लस्सी, ताक, योगर्ट अशा विविध स्वरूपात दह्याचा आहारात समावेश केला जातो. मात्र दह्याचे आरोग्यदायी फायदे असले तरीही काही पदार्थांसोबत दही खाणं हे आरोग्याला नुकसानकारकही ठरू शकते. दह्यासोबत काही चुकीचे खाल्ल्यास पोटात गडबड होणं, पचनकार्यामध्ये बिघाड होणं, उलट्या होणं, मन अस्वस्थ होणं अशा समस्या वाढतात. सावधान! यावेळी चुकूनही खाऊ नये दही;

दह्यासोबत कोणते पदार्थ खाणं टाळायलाच हवेत:

* आंब्यासोबत दही:
उन्हाळ्याच्या दिवसात लोकांना दही खाणं पसंत आहे. मात्र आंब्यासोबत दही खाणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकतं. दही नैसर्गिकरित्या थंड स्वरूपाचं आणि आंबा उष्ण असतो. त्यामुळे या दोघांना एकत्र खाणं आरोग्याला त्रासदायक ठरतं. कारण यामुळे शरीरात विषारी घटकांची निर्मिती होते.

* चीझसोबत दही:
चीझसोबत दही खाणं आरोग्याला त्रासदायक आहे. आयुर्वेदामध्ये यांना एकत्र खाणं नुकसानकारक असल्याचे सांगितले जाते. चीझ आणि दही एकत्र खाल्ल्याने शरीरात दोष निर्माण होऊ शकतात. म्हणूनच दह्यासोबत चीझ खाऊ नका.

* इडली डोसा:
इडली, डोसा हे पदार्थ आंबवून बनवले जातात. इडली,डोसा हे पदार्थ दह्यासोबत खाणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकतात. इडली, डोसा हे पदार्थ सांबार किंवा खोबर्‍याच्या चटणीसोबत खाल्ल्यास आरोग्यदायी ठरतात.

* केळं:
दह्यासोबत केळं खाणंदेखील आरोग्याला त्रासदायक ठरू शकतं. दह्यासोबत केळं खाणं आरोग्यामध्ये अनेक बिघाड करण्यास कारणीभूत ठरू शकतं. हेल्थ एक्सपर्टसच्या सल्ल्यानुसार, केळं आणि दही एकत्र खाल्ल्याने फ्लोरियाचा त्रास होऊ शकतो. केळं आणि दही एकत्र कधीच खाऊ नये. हे दोन्ही वेगवेगळ्या वेळेत खाणं अधिक फायदेशीर आहे. केळं आणि दही खाण्यामध्ये दोन तासांचा फरक असणं आवश्यक आहे.

* उडीद डाळ:
उडीद डाळीसोबत दही खाणं आरोग्यासाठी विषारी ठरू शकतं. उडीद डाळीच्या खिचडीसोबतही दही खाणं आरोग्याआ नुकसानकारक ठरतं. शरीरात यामुळे आम्ल म्हणजेच पित्त निर्माण होण्यास कारणीभूत ठरतं. यामुळे पचनक्रियेमध्ये बिघाड निर्माण होतो. सोबतच अनेक समस्या निर्माण होतात.

* दही आणि मासे:
तुमच्यापैकी बर्‍याच जणांनी ऐकलं असेल की दही आणि मासे एकत्र खाऊ नयेत. या दोन गोष्टी एकत्र खाल्ल्याने नुकसान होते. यामुळे उलट्या, अपचनाची समस्या उद्भवू शकतात.

* दही आणि कांदा:
उन्हाळ्याच्या दिवसात लोकांना या दोन्ही गोष्टी खायला आवडतात. कांदा गरम असताना दही थंड असते. या गोष्टी एकत्र खाल्ल्यामुळे अॅलर्जी, गॅस, अॅसिडिटी आणि उलट्यांचा त्रास होऊ शकतो. या दोन्ही गोष्टी कधीच एकत्र खाऊ नका.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Avoid eating these foods with curd health news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या