22 November 2024 2:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

आ. निलेश लंकेचा लंडनमध्ये डंका | वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

NCP Parner MLA Nilesh Lanke

पारनेर, २४ जून | राज्यातील कोरोना परिस्थिती ही दिवसेंदिवस गंभीर होत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके त्यांनी उभारलेल्या कोरोना कोविड सेंटरमध्ये जाऊन रुग्णांची काळजी घेत असल्याचं पाहायला मिळालं होतं. “माझं काय व्हायचं ते होऊ द्या मात्र जर मी घाबरून घरात बसलो तर या लोकांनी कोणाच्या दारात बसायचं. त्यामुळे मी असुरक्षित असलो तरी चालेल पण माझी लोक सुरक्षित असली पाहिजेत, हे शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांचे होते. मतदारसंघातील कोरोनाबाधित रुग्णांच्या आरोग्य सेवेचा निर्धार त्यांनी केला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही त्यांनी कोविड केअर सेंटरची उभारणी केली.

पारनेरला आमदार निलेश लंके यांनी उभारलेल्या शरद पवार आरोग्य मंदिर कोविड सेंटर मुळे हजारो रुग्णांना दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे आमदार लंके स्वतः रात्रंदिवस या कोविड सेंटर मधील रुग्णांची देखभाल करत होते. त्यामुळे लंके यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक केले जात होतं. कोविड सेंटर सुरू केल्यापासून आतापर्यंत भरभरून मदत या सेंटरला मिळाली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या समाज कार्यात अजून एका मानाचा तुरा रोवला गेला आहे. कारण त्यांच्या कामाची दखल आता आतंरराष्ट्रीय वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनने घेतली आहे. यासंदर्भात ट्विट करताना निलेश लंके यांनी म्हटलंय की, “कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल आज मला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीला हा सन्मान भेटला ही खुप मोठी गोष्ट आहे. हे सगळे शक्य झाले माझ्यावरती प्रेम करणाऱ्या मायबाप जनतेमुळे व सहकारी”.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: NCP Parner MLA Nilesh Lanke got Limca book of world record London for social work during corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#MLANileshLanke(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x