25 November 2024 2:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News SIP Vs Post Office | SIP की पोस्ट ऑफिस RD, कोणती गुंतवणूक तुम्हाला बनवेल लखपती, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News Business Idea | कमाईचे साधन शोधत आहात; मग या 3 बिझनेस टिप्स खास तुमच्यासाठी, जोमाने होईल 12 महिने कमाई - Marathi News NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, रॉकेट होणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
x

CBI, ED'चा वापर करुन राज्यात सरकार येईल असे भाजपला वाटत असेल तर ते अंधारात चाचपडत आहेत - संजय राऊत

Shivsena MP Sanjay Raut

मुंबई, २५ जून | अंमलबजावणी संचालनालयाने (ED) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरी आज सकाळी छापे टाकले. ईडीचे अधिकारी गेल्या चार तासांपासून तपास करत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात सीबीआय आणि ईडीचा गैरवापर होत असून भाजप या संस्थेचा राजकीय फायद्यासाठी वापर करत असल्याचा टोला राऊत यांनी लगावला आहे. भारतीय जनता पक्षाच्या अशा कृत्यांमुळे देशातील दोन महत्वाच्या मोठ्या संस्थेच अवमूल्यन होत असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. ते आज मुंबईतील प्रसार माध्यमांशी बोलत होते.

महाराष्ट्र तपासासाठी सक्षम:
अजित पवार आणि अनिल परब यांच्यावर जर काही आरोप असतील त्या तपासासाठी महाराष्ट्र सरकार आणि न्यायालय सक्षम असून यासाठी ईडी आणि सीबीआयची गरज नसल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

सरकार पाच वर्षे टिकणार:
ईडी आणि सीबीआयचा वापर महाराष्ट्रात आपले सरकार येईल असे जर भाजपला वाटत असेल तर अंधारात चाचपडत आहे अशी टिका संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली. महाविकास आघाडी सरकारने दोन वर्ष पूर्ण केले असून ते अजून पाच वर्षे टिकणार असल्याचे राऊत म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Shivsena MP Sanjay Raut slams BJP party after ED CBI misuse news updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x