4 December 2024 2:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Investment Tips | असा वाढेल पैशाने पैसा, तुमच्याकडील पैसे पुन्हा होतील डबल; या पर्यायांमध्ये गुंतवणूक करा - Marathi News Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IPO GMP | स्वस्त IPO आला रे, ग्रे-मार्केट'मध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा मिळेल - GMP IPO 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगा'बाबत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, कर्मचारी आणि पेन्शनधारकांना धक्का Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SUZLON Horoscope Today | काहींचा सामाजिक क्षेत्रात सहभाग वाढेल तर काहींना मिळेल यशाची गुरुकिल्ली, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य HAL Vs BEL Share Price | HAL आणि BEL डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, मजबूत कमाई होणार - NSE: HAL
x

गणेश उत्सव आला की सुटले सरकारचे फर्मान : राज ठाकरे

नवी मुंबई : आज नवी मुंबईमध्ये महानगरपालिका कर्मचारी मेळावा पार पडला. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी अनेक गंभीर मुद्यांना हात घातला. लवकरच गणपती उत्सव सुरु होणार असून त्याआधी न्यायालय आणि मुंबई महानगर पालिकेकडून निरनिराळे फार्मन सुटू लागल्याने राज ठाकरेंनी त्या मुद्याला हात घातला आहे.

राज ठाकरे यांनी या मुद्यावर बोलताना म्हटलं की, आता गणेश उत्सव आला की सरकारचे फर्मान सुटले – गणपती एवढ्याच जागेत बसवा . एवढ्याश्या जागेत बसवायचा तर कपाटातच बसवतो . हवाय कशाला सार्वजनिक गणेश उत्सव ? असे आदेश कुठून आणि कसे निघतात ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

तसेच न्याय असेलच तर सर्व धर्माना समान हवा असं सांगत राज ठाकरे म्हणाले की, ‘पूर्वी काँग्रेसच्या काळात हे घडत होते आणि आता भाजपचे राज्य आहे तरी हेच घडते आहे . तुम्हाला हव्या त्या गोष्टी कोर्टाकडून करून घेता आणि ज्या तुम्हाला नको आहेत त्या गोष्टी तुम्ही कोर्टाला नाकारायला लावता. न्यायालयं असो की निवडणूक आयोग असो, माझे हात जोडून सांगणे आहे की स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व टिकवा . तुम्ही कोणत्याही सरकारच्या नदी लागू नका अशी विनंती सुद्धा त्यांनी न्यायालयीन व्यवस्था आणि निवडणूक आयोगाला केली आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x