25 November 2024 3:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

सुप्रीम कोर्टाच्या नावे भाजपा मुख्यालयात अहवाल तयार करण्यात आला - मनिष सिसोदिया

Delhi Deputy CM Manish Sisodia

नवी दिल्ली, २५ जून | सर्वोच्य न्यायालयाच्या ऑक्सिजन ऑडिट समितीने दिलेला अहवाल अस्तित्वातच नसून हा भारतीय जनता पक्षाने तयार केला आहे असा गंभीर आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केला आहे. ऑक्सिजन ऑडिट समितीने दिलेल्या अहवालात मागील महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला असताना दिल्ली राज्य सरकारने गरजेपेक्षा चौपट ऑक्सिजनची मागणी केल्याचं वृत्त आहे.

हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे असं सांगताना मनिष सिसोदिया यांनी अहवालात नमूद करण्यात आलेली माहिती फेटाळून लावत भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्षाच्या मुख्यालयात हा अहवाल तयार केल्याचा आरोप केला आहे. “असा कोणताही अहवाल नसून तो अस्तित्वातच नाही. भारतीय जनता पक्षाने खोटं बोलत आहे. आम्ही ऑक्सिजन ऑडिट समितीशी बोललो आहेत. त्यांनी आम्ही स्वाक्षरी केल्याचं किंवा मंजुरी दिलं नसल्याचं सांगितल आहे,” अशी माहिती मनिष सिसोदिया यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे.

जर सदस्यांनी स्वाक्षरीच केली किंवा संमतीच दिली नसेल तर मग हा अहवाल आला कुठून? हा अहवाल आहे कुठे?,” अशी विचारणा मनिष सिसोदिया यांनी केली आहे. मनिष सिसोदिया यांनी यावेळी समितीने स्वाक्षरी केलेला अहवाल सादर करण्याचं आवाहनदेखील दिलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Delhi Deputy CM Manish Sisodia on supreme court Delhi oxygen audit committee report BJP news updates.

हॅशटॅग्स

#Arvind Kejariwal(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x