25 November 2024 7:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

देशमुखांच्या प्राथमिक चौकशीचे CBI'ला हायकोर्टाचे आदेश होते | ED'ला मध्ये आणून अटकेची टांगती तलवार?

Anil Deshmukh

मुंबई, २६ जून | 100 कोटी कथित वसुलीप्रकरणाच्या आरोपावरुन माजी गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आहेत. देशमुख यांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांना ईडीने अटक केल्यानंतर, आता स्वत: अनिल देशमुख यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. ईडीने अनिल देशमुख यांना समन्स बजावलं आहे. त्यांना ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहायचं आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याकरवी 100 कोटी रुपयांची वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप आहे. यानंतर कोर्टाच्या आदेशाने याप्रकरणाची चौकशी सुरु आहे.

एप्रिल महिन्यात आधी अनिल देशमुख यांची सीबीआयने चौकशी केली होती. त्यानंतर आता अनिल देशमुख यांची ईडीने चौकशी सुरु केली आहे. 25 जून रोजी ईडीने अनिल देशमुख यांच्या पाच ठिकाणांवर छापेमारी केली. त्यानंतर ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे (Kundan Shinde) आणि संजीव पालांडे यांना अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने शुक्रवारी रात्री उशिरा दोघांना बेड्या ठोकल्या. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्या अंतर्गत शिंदे आणि पालांडे यांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास न्यायालयात हजर करणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

तत्पूर्वी म्हणजे ५ एप्रिल २०२१ च्या सुनावणीत हे अभूतपूर्व प्रकरण असल्याचं मुंबई हायकोर्टाने म्हणाले होते. खुद्द मुंबई पोलिस आयुक्तांनीच गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे सत्य बाहेर येणे आवश्यक असल्याने आम्ही प्राथमिक चौकशीचा आदेश देत आहोत, असं उच्च न्यायालयाने म्हटलं होतं. तर, प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यातील अहवालाच्या आधारे जी काही कार्यवाही कायद्यानुसार करायची असेल त्याचा निर्णय सीबीआय संचालकांनी घ्यावा, मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले होते.

मात्र हे आदेश सीबीआयला देण्यात आले होते. मात्र जाणिवणूपर्वक त्यात ईडी’ला आणून या आदेशाला बगल देण्याची योजना तर नसावी अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. केंद्र सरकार दबावा वाढवण्यासाठी एक मोठ्ठी कारवाई ईडीच्या आडून करण्याची शक्यता वर्तविण्यात येतं आहे. अनिल देशमुख आणि काही इतर व्यक्तींच्या विरोधात ईडीनं गेल्याच महिन्यात मनी लाँड्रिंग कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. सीबीआयनं मुंबई हायकोर्टाच्या आदेशनुसार एका गुन्ह्याची नोंद करत सुरूवातीचा तपास केला होता. त्यानंतर ईडीनं गुन्हा नोंदवला. त्यामुळे अनिल दशमुख यांच्यावर अटकेची तलवार असल्याचं म्हटलं जातंय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Anil Deshmukh news Live today ED issues summons to Maharashtra former home minister news updates.

हॅशटॅग्स

#AnilDeshmukh(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x