फडणवीस बरळले | म्हणाले, यांच्या बायकांनी यांना मारलं, तरी ते मोदीजींनी केलं असं म्हणतील
मुंबई, २६ जून | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्यभरात 1 हजार ठिकाणी भाजपकडून 26 जून अर्थात आज शनिवारी जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलीय. त्या पार्श्वभूमीवर आज राज्यभरात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.
मुंबईतल्या मुलुंड चेकनाक्याजवळ भाजपा आमदार आशिष शेलार यांनी कार्यकर्त्यांसोबत चक्काजाम आंदोलन सुरू केलं असून यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. आंदोलनादरम्यान बोलताना आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. “ओबीसींना मिळालेलं राजकीय आरक्षण फक्त महाविकासआघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलं आहे. कोर्टाला हवा असलेला इंपेरिकल डाटा त्यांनी दिला नाही. आयोगाची निर्मिती केली नाही. त्यामुळे आरक्षण गेलं. हे राजकीय आरक्षण परत मिळवणं ही भाजपाची घोषणा आहे. त्यासाठी आम्ही कोणत्याही थरापर्यंत जाऊ आणि आरक्षण मिळवून देऊ”, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.
फडणवीस यांनी देखील यावरून राज्य सरकारला लक्ष केलं आहे. ते म्हणाले १३ डिसेंबर २०१९ ला सर्वोच्च न्यायालयाने आदेशात सांगितलं की के कृष्णमूर्ती यांच्या जजमेंटमध्ये सांगितलं प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे ओबीसी आरक्षण आहे, त्या ठिकाणी राज्य मागास वर्ग आयोग तयार करुन दर दहा वर्षांनी इम्पेरिकल डाटा तयार करा आणि त्यावरुन राज्यसरकारला सांगितले की याचा कम्लॅअन्स करा पुढच्या तारखेला आम्हाला सांगा. यामध्ये राज्य सरकारला इतकंच करायचं होतं की राज्य मागास वर्ग आयोग तयार करुन त्यांना इम्पेरिकल डाटा तयार करण्यासाठी एजन्सी नेमायची होती, तसं अॅफीडेवि़ट लिहून सादर करायचं होतं, त्यामुळे सर्व हे ५० टक्क्याच्या आतलं आरक्षण वाचलं असतं, मात्र या सरकारने १५ महिने अॅफीडेवि़टच केलं नाही असं फडणवीस म्हणाले.
पुढे फडणवीस म्हणाले की, या सरकारला आता ओबीसी आरक्षण द्यावं लागेल नाही तर खुर्ची खाली करावी लागेल. मोदीजींकडे बोट दाखवत त्यांनी डेटा दिला नाही असं सांगतात, मात्र या सरकार मधील मंत्री एक मेकांच कपडे फाडायला तयार आहे. हे सरकार प्रत्येक गोष्टीत मोदी कडे बोट दाखवतात, आता यांच्या बायकांनी याना मारलं तरी ते मोदी जी नी केलं अस म्हणतील असं धक्कादायक आणि व्यक्तिगत पातळीवरील विधान फडणवीसांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.
News Title: OBC reservation quota Devendra Fadnavis criticized MahaVikas Aghadi leaders on personal level news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | आयुष्य बदलण्यासाठी 442 रुपयाचा 'हा' फॉर्मुला कामी येईल, 1-2 नव्हे तर 5 करोडचे मालक व्हाल - Marathi News
- Post Office Scheme | योजनेत गुंतवा केवळ 500 रुपये आणि मिळवा 2 लाख रुपयांचा तगडा फंड, कॅल्क्युलेशन समजून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 45% पर्यंत परतावा - NSE: TataMotors
- Naga Chaitanya Sobhita Dhulipala | दक्षिणात्य सुपरस्टार लवकरच बांधणार लग्नगाठ, लग्नाआधीच्या विधींचे फोटोज वायरल
- Zomato Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार झोमॅटो शेअर, मिळेल मल्टिबॅगर परतावा, स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ZOMATO
- Dhananjay Powar | बिग बॉस फेम धनंजय पोवार देतोय बिग बॉसमध्ये जाण्यासाठी ट्रेनिंग, गमतीशीर व्हिडिओ झालाय व्हायरल
- NTPC Share Price | एनटीपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर तेजीत धावणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NTPC
- IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर BUY करावा, SELL करावा की 'HOLD' करावा, तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला - NSE: IREDA
- Infosys Share Price | इन्फोसिस सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळणार मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: INFY
- Smart Investment | तुमच्या लेकीच्या भविष्यासाठी मिळेल 50 लाखांचा फंड, फायद्याच्या योजनेत बचत करा, खर्चाची चिंता मिटेल