22 November 2024 10:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

उत्तर प्रदेशच्या निवडणुका जवळ आल्या | पंतप्रधान मोदींना आठवलं 'अयोध्या विकास मॉडेल'

Uttar Pradesh Assembly Election 2022

नवी दिल्ली, २६ जून | अयोध्याच्या विकासासाठी बनवलेल्या व्हिजन डॉक्युमेंट्सबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक व्हर्च्युअल पद्धतीने घेण्यात आली असून सुमारे 45 मिनिटे चालली. या बैठकमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दोन्ही उपमुख्यमंत्री केशव मौर्य आणि दिनेश शर्मा यांच्यासह 13 लोक उपस्थित होते. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या बैठकीमध्ये ट्रस्टच्या कोणत्याचा संदस्यांना बोलावले नसल्याचे सांगितले जात आहे.

कारण एकीकडे ट्रस्टवर जमीन खरेदीच्या व्यवहारावरुन मोठे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे राम मंदिर ट्रस्ट वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या बैठकीसाठी पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीहून तर इतर मंत्री व अधिकारी सीएम योगी यांच्या निवासस्थानावरुन बैठकीत सामील झाले होते. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून व्हिजन डॉक्युमेंटसचा आढावा घेतला.

बैठकीत योजनेला प्रत्यक्षात आणण्याच्या रणनीतीवर चर्चा:
सदरील बैठकीत अर्थसंकल्पानुसार योजना प्रत्यक्षात आणण्याच्या व भविष्यासाठी तयार ठेवण्याच्या रणनीतीवर चर्चा झाली. यासाठी एकट‌्या उत्तर प्रदेश सरकारने 14 कोटींचा आराखडा तयार केला आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या अनेक योजनांचाही या व्हिजन डॉक्यूमेंटसमध्ये समावेश आहे. ही योजना केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राबवली जात आहे.

विधानसभा निवडणुकांपूर्वी अयोध्या चमकवण्याचा सराव सुरू:
पुढच्या वर्षी होणार्‍या उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांपूर्वी अयोध्या चमकवण्याची तयारी सुरु आहे. यासाठी अयोध्या विकास प्राधिकरणाने एक मास्टर प्लॅन तयार केला असून केंद्र आणि राज्य सरकारसमवेत जवळपास 20 हजार कोटींच्या प्रकल्पांवर काम सुरू आहे. या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना आजच्या व्हर्च्युअल बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अयोध्याच्या विकासकामांबाबत दीपक कुमार प्रधान सचिव गृहनिर्माण यांनी सादरीकरण केले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Uttar Pradesh Assembly Election 2022 PM Narendra Modi meeting on Ayodhya Development Model news updates.

हॅशटॅग्स

#UttarPradeshAssemblyElection2022(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x