21 November 2024 7:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Health First | चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि डाग दूर करा - वाचा सविस्तर

Home remedies for skin burns

मुंबई, २६ जून | सुंदर आणि चमकदार चेहरा कोणाला नको असतो. त्वचेला नैसर्गिकरित्या सुंदर बनवण्यासाठी आपण घरगुती उपाय केले पाहिजेत. यामुळे आपली त्वचा नेहमीसाठीच चांगली राहते. विशेष म्हणजे हे घरगुती उपाय करण्यासाठी पैसे आणि वेळही लागत नाही. आज आम्ही तुम्हाला सुंदर त्वचा होण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहोत.

हऱ्यावर जखमा अथवा डाग दिसायला खूपच खराब वाटतात. या डागांमुळे चेहऱ्याची सुंदरता बिघडते. तसेच आत्मविश्वासही कमी होतो. जखमांच्या खुणा मिटवणे कठीण नाही मात्र त्यासाठी तुम्हाला काही उपाय नियमितपणे करावे लागतील. काही नैसर्गिक पदार्थांमध्ये ब्लीचिंग एजंट असते जे डाग कमी करण्यास मदत करतात. याच्या प्रयोगाने काही दिवसांतच चेहऱ्यावरील सुरकुत्या, पिंपल्सचे डाग, डार्क सर्कल, जखमांच्या खुणा आणि चिकनपॉक्सचे निशाण कमी होण्यास मदत होईल.

आपल्या त्वचेसाठी तांदळाचे पीठ अत्यंत फायदेशीर असते. तांदूळ केवळ स्वादिष्ट अन्न तयार करण्यासाठीच नव्हे, तर त्वचेच्या उपचारांसाठीही वापरले जातात. तांदळाची पेस्ट चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. यासाठी एका भांड्यात एक चमचा तांदळाचे जाडसर पीठ आणि दोन चमचे गुलाब पाणी घेऊन त्याची पेस्ट तयार करुन घ्या. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि हातावर स्क्रबप्रमाणे लावा आणि काहीवेळाने धुवून टाका.

जर, आपली त्वचा तेलकट असेल, तर तांदळाचे पीठ आणि ग्रीन टीचा फेस पॅक आपल्या त्वचेसाठी खूप चांगला ठरेल. हा फेस पॅक बनवण्यासाठी एका वाटीत एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा ग्रीन टी आणि 2 चमचे तांदळाचे पीठ घेऊन त्याची पेस्ट तयार करा. ही तयार पेस्ट आपल्या चेहऱ्यावर किमान 15 मिनिटे लावून ठेवा. नंतर पाण्याने चेहरा धुवा. यामुळे मुरुम आणि डागांच्या समस्यांपासून मुक्ती मिळेल. तसेच, त्वचा चमकदार होईल.

तांदळाच्या पिठामध्ये कॅल्शिअम, व्हिटॅमिन डीसह फायबरची मात्रा भरपूर आहे. तसंच यामध्ये अतिरिक्त प्रमाणात लोह व थायमीन यासारख्या पोषक घटकांचाही समावेश असतो. या सर्व पोषण तत्त्वांमुळे त्वचेची खोलवर स्वच्छता होते. दोन चमचे तांदळाचे पीठ, एक चमचा बटाट्याची पेस्ट, एक चमचा ऑलिव्ह ऑइल सर्व सामग्री एकत्रित करून स्क्रब तयार करा. ही पेस्ट मान व चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटांनंतर थंड पाण्याने आपल्या चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. या स्क्रबच्या वापरामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Home remedies facial treatment for skin burns news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x