22 November 2024 5:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

लग्नासाठी वर हवा | पण न पादणारा आणि ढेकर न देणारा नवरा पाहिजे | लग्नाची जाहिरात चर्चेत

Viral Advertisement

मुंबई, २७ जून | भारतातील स्त्रीवादी विचार असलेले लोक, शक्यतो जीवनाचा साथीदार शोधण्यासाठी वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित होणाऱ्या विवाह विषयक जाहिरातींची मदत घेत नाहीत. वृत्तपत्रांमधील अशा प्रकारच्या बहुतांश जाहिराती या धर्म, जात यावर आधारित असतात. त्याचबरोबर या जाहिरातींमध्ये प्रामुख्यानं त्वचेचा रंग, उंची, चेहऱ्याचा आकार असे शारीरिक गुणधर्म यांची माहिती असते. तर अनेक जाहिरातींमध्ये सहा आकडी पगार, कुटुंबाची संपत्ती, मालमत्ता यांचाही उल्लेख असतो.

त्यामुळंच, गेल्या आठवड्यामध्ये भारतातील सर्वाधिक खप असलेल्या वृत्तपत्रातल्या एक जाहिरात चांगलीच व्हायरल झाली. एका मुलीसाठी ही जाहिरात देण्यात आली होती. जाहिरातीत मुलीचा उल्लेख ठाम स्त्रीवादी, छोटे केस असलेली आणि पियर्सिंग केलेली असा करण्यात आला होता.

तर मुलगा कसा हवा यासाठी आणखीच गमतीशीर वर्णन होतं. हँडसम, श्रीमंत आणि त्याचबरोबर ढेकर न देणारा आणि फार्टिंग न करणारा असं यात म्हटलं होतं. यातही तो स्त्रीवादी मताचा असावा ही अट मात्र कायम होती. त्यामुळं ही जाहिरात व्हायरल झाली.

कॉमेडियन आदिती मित्तल हिनं ट्विटरवर, ही जाहिरात कुणी माझ्यासाठी तर दिली नाही ना अशी विचारणा केली. प्रसिद्ध अभिनेत्री रिचा चढ्ढासह अनेकांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे: ही जाहिरात खरी आहे का? आणि ही जाहिरात नेमकी कोणी दिली याबाबत अनेकांनी विविध प्रकारचे अंदाज लावले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Viral Advertisement About Wanted A Groom Funny Expectations Of Bride Saying He Should Not Farter Of Burper news updates.

हॅशटॅग्स

#SocialMedia(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x