23 November 2024 7:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नव्हते | लोकांना फसवून सत्ता मिळवणं हाच भाजपचा उद्देश - बाळासाहेब थोरात

OBC Reservation

मुंबई, २८ जून | विदर्भ स्वंतत्र राज्य होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही, अशी प्रतिज्ञा २००४ साली देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री नसताना केली होती. आता त्यांचे लग्न होऊन कित्येक वर्षे उलटली, ते पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मात्र स्वतंत्र विदर्भाबाबत त्यांनी चक्कार शब्दसुद्धा काढला नाही.

भाजपने विदर्भातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा दिला. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी अनेक सभेत स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन दिले. इतकेच नाहीतर वेगळ्या विदर्भ राज्याची घोषणा होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही, अशी घोषणाही त्यांनी काही वर्षांपूर्वी केली होती. त्यानंतर फडवणीसांचे लग्नही झाले. पाच वर्षे सत्तेत राहूनही वेगळ्या विदर्भाच्या विषयावर ते गप्प आहेत.

त्यात ओबीसी आंदोलनावरून देवेंद्र फडणवीस यांनी अजून घोषणा करताना ओबीसी समाजाला आश्वासन दिलं आणि त्यांची सर्व जुनी आश्वासनं विरोधकांनी बाहेर काढली. त्यात धनगर समाजाला २०१७ मध्ये दिलेलं जाहीर आश्वासन देखील समाज माध्यमांवर व्हायरल झालं आहे. त्यात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील त्यांच्या त्या वेगळ्या विदर्भासंदर्भातील प्रतिज्ञेची आठवण करून देत खिल्ली उडवली होती..

आता ओबीसी आरक्षण दिलं नाही तर संन्यास घेईन म्हणतात, मात्र यापैकी काही झालं नाही”, असा टोला काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. आमच्या हातात सूत्र द्या, तीन ते चार महिन्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत करुन देतो, अन्यथा राजकारणातून संन्यास घेईन, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावरुन बाळासाहेब थोरात यांनी टोला लगावला.

सत्तेसाठी काहीही बोलायचं, नंतर कृती करायची नाही, हा भाजपचा पहिल्यापासूनचा प्रयत्न आहे. जनमाणसाला फसवणं आणि सत्ता मिळवणं हा उद्देश ठेवून ते अशी वक्तव्य करतात, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. स्वतंत्र विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मात्र त्यानंतर काय झालं आपण सर्वांनी पाहिलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणा गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Congress leader Balasaheb Thorat target Devendra Fadnavis over promise to OBC reservation news updates.

हॅशटॅग्स

#OBC(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x