21 November 2024 8:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Health First | अंड्याबरोबर हे पदार्थ मुळीच खाऊ नका | एलर्जिचा धोका

Avoid eating with eggs

मुंबई, २९ जून | अंडे हे एक सुपर फूड मानले जाते. दररोज एक अंडे खाणे हे तब्येतीला अतिशय चांगले आहे. अंडे अतिशय पौष्टिक आहे हे आता सर्वांनीच मान्य केले आहे. अनेक आहारशास्त्र तज्ञ दररोज अंडे खाण्याचा सल्ला देतात. त्याचे प्रमुख कारण हे की अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, विटामीन आणि मिनरल्स असतात. तसेच त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स अगदी कमी प्रमाणात असतात.

त्यामुळे दररोज एक अंडे खाणे हे तुमचे वजन वाढू न देता उत्तम पोषण देते. अतिशय हेल्दी असते. परंतु हे गुणकारी असणारे अंडे चुकीच्या पद्धतीने खाल्ले असता मात्र अतिशय नुकसान करू शकते. अनेकदा आपल्या नकळत आपण एकावेळी असे दोन पदार्थ खातो जे एकत्र खाणे चुकीचे आहे. त्यामुळे तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. आयुर्वेदात देखील अशा पद्धतीचे खाणे निषिद्ध मानले गेले आहे. निषिद्ध आहारामुळे पचनशक्तीवर परिणाम होतो. तसेच अशक्तपणा, थकवा आणि उलट्या जुलाब देखील होऊ शकतात. म्हणून चुकीच्या कॉम्बिनेशनचे पदार्थ खाणे योग्य नाही. ह्याच प्रकारे अंडे देखील चुकीच्या पदार्थांबरोबर खाल्ले असता एलर्जिचा त्रास होऊ शकतो. एरवी गुणकारी असणारे अंडे त्यामुळे आपल्या शरीरासाठी टॉक्सिक होऊ शकते. ह्याचा आपल्या प्रकृतीवर वाईट परिणाम होऊ शकतो.

चला तर मग, आपण जाणून घेऊया की कोणत्या पदार्थांबरोबर अंडे खाणे योग्य नाही:

१. साखर:
अंड्याबरोबर कधीही कोणत्याही स्वरूपात साखर खाऊ नये. त्याचे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. साखर आणि अंडे ह्या दोन्हीमध्ये अमायनो ऍसिड असते. ह्या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्या तर शरीरात जास्त प्रमाणात अमायनो अॅसिड जाते जे टॉक्सिक असते आणि त्यापासून रक्तात गुठळी होण्यासारखा गंभीर आजार देखील होऊ शकतो.

२. सोया मिल्क:
सोया मिल्क मध्ये सोया प्रोटीन असते जे अंड्यापासून मिळणाऱ्या प्रोटीनपेक्षा प्रकृतीने वेगळे असते. त्यामुळे जर सोया मिल्क आणि अंडे एकाचवेळी सेवन केले तर हे प्रोटीन शरीरात शोषले जाणे अवघड होते. त्याचा प्रकृतीला त्रास होऊ शकतो.

३. चहा:
बरेच वेळा लोक सकाळी चहा घेतला की लगेच अंडे खाऊन नाश्ता करून घेतात.सकाळी अंडे खाणे तर चांगले आहे परंतु चहावर लगेच अंडे खाणे प्रकृतीच्या दृष्टीने अतिशय हानिकारक आहे. चहा पाठोपाठ खाल्लेले अंडे हे टॉक्सिक बनते आणि ते टॉक्सीन्स शरीरात पसरतात. त्यामुळे पचनशक्तीवर परिणाम होऊन कॉन्स्टिपेशन होऊ शकते.

४. अंडे आणि इतर मांसाहारी पदार्थ:
मांसाहारी लोक बरेचदा दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात अंडे आणि इतर मांसाहारी पदार्थ बरोबर खातात. परंतु असे दोन्ही पदार्थ एकावेळी खाणे योग्य नाही. जरी त्यामुळे थेट काही अपाय होत नसला तरी अंड्यात तसेच इतर मांसाहारी पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फॅटस् असल्यामुळे ते एकावेळी खाल्ले की शरीरात जडपणा जाणवणे, पचनशक्ती अतिशय कमी होणे, सुस्ती येणे आणि अग्निमांद्य म्हणजेच भूक न लागणे अशी लक्षणे दिसून येतात.

तर हे आहेत असे ४ पदार्थ जे अंड्याबरोबर मुळीच खाऊ नयेत. त्यामुळे अंडे खाण्याचा काही उपयोग तर होत नाहीच शिवाय प्रकृतीला अपाय होतो. आजारी पडण्याची वेळ येऊ शकते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Avoid eating these things along with eggs health news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x