22 November 2024 6:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Health First | दोडक्याचे ५ आरोग्यदायी गुणधर्म माहित आहेत का? | नक्की वाचा

Ridged Gourd Benefits

मुंबई, २९ जून | दोडक्याची भाजी म्हटली की आपल्यापैकी बहुतेक सगळे जण नाक मुरडतात. परंतु दोडका किती गुणकारी आहे हे समजले की आपण नियमितपणे दोडका खाऊ हे मात्र नक्की. चला तर मग आज आपण दोडक्याचे गुणधर्म जाणून घेऊया. दोडका ही भाजी खरंतर भारतात सर्वत्र मुबलक प्रमाणात आढळते. पण ही भाजी मुळची सपक चवीची असल्यामुळे ती फारशी लोकप्रिय नाही. चव वाढवण्याकरता बरेचसे मसाले वापरून ही भाजी केली जाते. परंतु चवदार नसली तरी ही भाजी वजन कमी करायला, डोळ्यांचं आरोग्य सुधारायला आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवायला खूप उपयोगी पडते.

आशिया खंडात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारी हि वेल साधारण ९ मी. उंचीपर्यंत वाढते. झाडाला पिवळ्या रंगाची फुले लागतात व त्यानंतर हिरव्या रंगाचे, लांबट आकाराचे दोडके येतात, जे भाजी म्हणून वापरले जातात. दोडके खाल्ले जाते ते त्याच्या ह्या गुणधर्मामुळेच. आज आपण हे सगळे गुणधर्म सविस्तर जाणून घेऊया…

१. डोळ्यांचे आरोग्य सुधारते:
दोडक्यामध्ये भरपूर प्रमाणात बिटा कॅरेटीन आणि विटामीन ए असल्यामुळे दृष्टी सुधारण्यासाठी तसेच डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी दोडका अतिशय गुणकारी आहे. उतारवयात होणारा दृष्टिदोष होऊ नये म्हणून आधीपासून नियमितपणे दोडका आहारात असावा.

२. ऍनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता ह्यावर गुणकारी:
दोडक्यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असल्यामुळे दोडका हा ऍनिमियावर अत्यंत गुणकारी आहे. तसेच दोडक्यामध्ये विटामीन बी-६ असल्यामुळे शरीरातील तांबड्या रक्त पेशींचे प्रमाण वाढण्यास मदत होते. त्यामुळे शरीरातील सर्व अवयवांपर्यन्त रक्तपुरवठा होण्यास खूप मदत होते.

३. वजन कमी करण्यासाठी उपयोगी:
दोडक्यामध्ये अतिशय कमी कॅलरीज असतात. तसेच त्यामध्ये सॅच्युरेटेड फॅटस् आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण देखील अतिशय कमी असते. त्यामुळे दोडका शरीरातील प्रोटीन, कार्बस् आणि फॅटचे विघटन करण्यास मदत करतो. तसेच जास्त प्रमाणात मेद शरीरात साठून राहू देत नाही. पचनास मदत करतो. ह्याशिवाय रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतो. ह्या सर्व गुणधर्मांमुळे दोडक्याचे नियमित सेवन वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.

४. बद्धकोष्ठते वर गुणकारी:
दोडक्यामध्ये वॉटर कंटेंट म्हणजेच पाणी मोठ्या प्रमाणात असते. तसेच दोडक्याच्या आतील पांढरा भाग सेल्युलोजने बनलेला असतो. सेल्युलोज हा एक फायबरचा प्रकार आहे ज्यामुळे पचनास मदत होते. म्हणून दोडक्याची भाजी अथवा दोडका घालून केलेली आमटी नेहेमी आहारात ठेवली की पचनाच्या समस्या कमी होतात. कॉनस्टीपेशन होत नाही. दोडक्याचा रस चमचाभर मध घालून घेतला असता अपचनाच्या समस्येवर त्वरित आराम मिळतो.

५. यकृत म्हणजेच लिवरचे कार्य सुधारते:
दोडक्यामध्ये रक्तशुद्धीचे गुणधर्म देखील आहेत. टॉक्सिन्स्, ऑक्सिडंट्स, अल्कोहोल, न पचलेले अन्न ह्यामुळे शरीरात निर्माण होणारी अशुद्धी दूर करून रक्त शुद्ध करण्यासाठी दोडक्याचे नियमित सेवन मोठा हातभार लावू शकते. त्यामुळे लिवरचे कार्य सुधारते तसेच शरीरात होणारा पित्तरसाचा स्त्राव नियंत्रणात राहतो. ह्या गुणधर्मामुळे दोडका काविळीवर अत्यंत गुणकारी आहे.

तर हे आहेत दोडक्याचे आरोग्यदायी असे ५ गुणधर्म. दिसायला फारशी चांगली नसली आणि सपक चवीची असली तरी ही भाजी अतिशय गुणकारी आहे हे आता आपल्या लक्षात आले आहेच.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Benefits of eating Ridged Gourd health news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x