22 November 2024 6:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

तिसऱ्या लाटेपूर्वी मुंबई महापालिका सज्ज | 35 दिवसात 2170 बेडच्या कोव्हिड रुग्णालयाची निर्मिती

Maharashtra corona pandemic

मुंबई, २९ जून | महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जात आहे. येत्या काही दिवसात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी तिसऱ्या लाटेसाठी सर्व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर मुंबईत केवळ 35 दिवसात 2170 बेडच्या कोव्हिड रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.

राज्यात अनलॉक केल्यानंतर काही शहरांमध्ये पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिकेकडून सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहे.

मुंबई महापालिकेने मालाड भागात केवळ 35 दिवसात कोरोना रुग्णालयाची निर्मिती केली आहे. हे कोव्हिड रुग्णालय जर्मन तंत्रज्ञानाच्या आधारे बनवण्यात आले आहे. हे रुग्णालय अग्निरोधक आणि पर्यावरण अनुकूल आहे. या रुग्णालयात 70 टक्के बेड हे ऑक्सिजनयुक्त आहेत. तसेच 384 बेड हे आयसोलेशनसाठी ठेवण्यात आले आहेत.

या रुग्णालयात मुलांसाठी 42 आयसीयू बेड बसविण्यात आले आहेत. तर यासह 20 बेड डायलिसीससाठी आहेत. या रुग्णालयावर नजर ठेवण्यासाठी 240 सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई विकास प्राधिकरणाकडून हे रुग्णालय बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Mumbai BMC built 2170 beds jumbo covid 19 hospital with in 35 days at Malad news updates.

हॅशटॅग्स

#BMC(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x