22 November 2024 2:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर | सार्वजनिक गणेशमूर्ती 4 फूट तर घरगुती बाप्पा 2 फुटांचा - वाचा सविस्तर

Ganesh Utsav 2021 news updates

मुंबई, २९ जून | संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके दैवत असणाऱ्या गणपतीच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. यामध्ये सार्वजनिक गणेशमूर्तीसाठी 4 फूट तर घरगुती गणेशमूर्तीसाठी 2 फुटांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. मात्र, गणेश मूर्तीकार आणि मंडळांनी यंदा गणेशमूर्तीच्या उंचीवर बंधने नकोत, अशी भूमिका घेतल्याने राज्य सरकारच्या या निर्णयाचे काय पडसाद उमटतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

गणेशमूर्तीच्या उंचीवर मर्यादा नकोच:
यंदाच्या गणेशोत्सवदरम्यान गणेशमूर्तीच्या उंचीबाबत मर्यादा राज्य सरकारने घालून देऊ नये, अशी मागणी मूर्तीकार आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून केली जातीये. गेल्यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करताना 4 फुटापर्यंत गणेशमूर्तीची उंची असावी, अशाप्रकारच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, यंदा अशी मूर्तींच्या उंचीबाबत मर्यादा घालू नये, अशी विनंती केली जात आहे.

गृहविभागाच्या गणेशोत्स साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना:
* गणेशोत्सवाबाबत परवानगी घेणे अपेक्षित.
* कोरोना संसर्ग पाहून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा.
*सार्वजनिक गणेशमूर्ती ४ फूट आणि घरगुती गणेश मूर्तीची उंची २ फूट असावी
*विसर्जन कृञिम तलावात करावे, शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती ठेवावी.
* नागरिक देतील ती वर्गणी स्विकारावी.
* शक्यतो मंडप परिसरात होणारी गर्दी टाळावी.
*सांस्कृतिक उपक्रमाऐवजी आरोग्य कार्यक्रम राबवावेत
* आरती, भजन, किर्तन या दरम्यान होणारी गर्दी टाळावी.
*नागरिकांची गर्दी होऊ नये या अनुषंगाने गणपतीचे दर्शन ऑनलाईन पद्धतीने ठेवावे.
* गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Maharashtra state government guidelines for Ganesh Utsav 2021 news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x