लग्नाच्या वऱ्हाडींना मटणाचा पाहुणचार मिळाला नाही | संतापलेल्या नवरदेवाने केले दुसरीशी लग्न
भुवनेश्वर, ३० जून | सध्याच्या काळात लग्न समारंभातील अनेक चित्रविचित्र किस्से समोर येत आहेत. ऐकावे ते नवलच अशा स्वरुपाच्या या बातम्या असतात. कधी नजर खराब झाली म्हणून नवरदेव लग्नाला नकार देतो तर कधी अग्निभोवती फेरे पूर्ण करताना शेवटच्या क्षणी नवरदेव नवरी पसंत नसल्याने लग्नाला नकार देतो, असे किस्से समोर येत आहेत. भारतीय समाजात लग्नसमारंभ हा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम असतो. त्यातच लग्नात जेवणाच्या मेन्यूला तर विशेष महत्त्व असते. लग्नातील सुग्रास जेवण हा अभिमानाने मिरवण्याचादेखील विषय असतो. यामुळेच लग्नात येणाऱ्या एकूण खर्चात खाण्या-पिण्यावरील खर्च हा एक महत्त्वाचा घटक असतो.
अनेकवेळा तर असेही आढळून आले आहे की जेवणाचा मेन्यू नापसंत असल्याने लग्न मोडले आहे. याच प्रकारातील पुढची कडी असलेली एक घटना सध्या खूप व्हायरल होते आहे. नवरदेवाकडील वऱ्हाडी मंडळींच्या लक्षात आले की जेवणात मटण बनवलेले नाही. ही बाब वऱ्हाडी मंडळींनी नवरदेवाच्या लक्षात आणून दिली.समोर आलेल्या माहितीनुसार ओडिशातील एका लग्नात वऱ्हाडी मंडळींना जेवणात मटण न दिल्याने नवरदेवाला राग आला. रागाच्या भरात नवरदेवाने नवरीऐवजी दुसऱ्याच एका मुलीशी लग्न केले. या घटनेनंतर परिसरातील नागरिक आश्चर्याने थक्क झाले आहेत.
नवरीकडच्या नातेवाईकांनी नवरदेवाला लग्नासाठी राजी करण्याचे प्रयत्न केले. परंतु रमाकांत पात्राने कोणाचेही ऐकले नाही. अखेर रमाकांत पात्र लग्नमंडप सोडून आपल्या एका नातेवाईकाबरोबर त्याच्या गावी निघून गेला. त्या गावी आपल्या नातेवाईकाच्या घरी तो थोडा वेळ थांबला. यानंतर रमाकांत पात्राने त्याच रात्री एका दुसऱ्या मुलीशी लग्न केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात आतापर्यत मुलीच्या कुटुंबियांनी किंवा नातेवाईकांनी अद्याप कोणतीही तक्रार नोंदवलेली नाही.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- Hair Style | कोणाचीही मदत न घेता साडी आणि सलवार कुर्त्यावर करा स्वतःची हेअर स्टाईल ; सणासुदीच्या दिवसांत मदत होईल
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Salman Khan | सलमान खानला पुन्हा जिवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना 2 कोटींच्या मागणीचा आला मेसेज - Marathi News
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Post Office Scheme | दर 3 महिन्यांनी 10,250 रुपये देईल ही योजना, प्लस मॅच्युरिटीला 7,05,000 रुपये मिळतील, फायदा घ्या - Marathi News
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News