मानवी तंत्र | समोरची व्यक्ती तुमच्याशी खोटं बोलत आहे, हे कसे ओळखाल? | या ट्रिक्स नक्की वाचा
मुंबई, ३० जून | आपल्या अवतीभोवती कायमच कोणी ना कोणी माणसं असतात. काही ओळखीची काही अनोळखी. नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारी, कामाच्या ठिकाणचे सहकारी, जाता येता वाटेत तोंडओळख झालेली माणसं. यातले काही जण अगदी आपल्या परिचयाचे असतात तर काही जणांची जुजबी ओळख असते. काही ना काही कारणाने आपण एकमेकांच्या संपर्कात येतो. कोणी कामासाठी गोड बोलतं, कोणी आपुलकीनं जवळ येतं, कोणी मदत करणारं, कोणी फायदा घेणारं अशी तऱ्हेतऱ्हेचा माणसं.
संवाद साधताना आपण केवळ शब्दांनी तो साधत नसतो. त्यात शरीराची भाषा, हावभाव, अभिनिवेश या गोष्टी महत्वाच्या असतात. या सर्व गोष्टी एकत्रितपणे जमू लागल्या की आपल्याला संवाद कौशल्य आहे असे म्हणायला हरकत नसते. आपले हावभाव आणि शरीराची भाषा आपल्या मनात नक्की काय चालले आहे याचा आरसाच आपल्या चेहऱ्यावर ठेवत असतात.
त्यावरून आपल्या जवळच्या व्यक्तींशी बोलत असताना अनेकदा ते आपल्या मनात काय चालले आहे हे अगदी बिनचूक ओळखतात. याचे कारण म्हणजे त्यांचे आपल्या हावभावांवर विशेष लक्ष असते. त्यावरून ते आपले अंतरंग जाणण्याचा प्रयत्न करतात.
याच हावभावांचे निरीक्षण करून तुम्ही समोरची व्यक्ती तुमच्याशी खरे बोलत आहे कि नाही हे ओळखू शकता. त्यासाठी काही गोष्टींवर बारीक लक्ष द्यावे लागते. एक खोटं बोलल्यावर ते लपविण्यासाठी शंभर वेळा खोटं बोलावं लागतं. हे सगळं करताना सामान्य माणसाचे हावभाव, त्याची बॉडी लँग्वेज बदलते.
जो अट्टल खोटारडा असतो, त्याला पकडणे अत्यंत कठीण असते पण जाणकार त्याचेही खोटे अगदी बरोबर पकडतात. अट्टल गुन्हेगार खरं बोलतोय की खोटं हे समजणं अतिशय कठीण असतं. पण जर तुम्ही बारीक निरीक्षण करायला शिकलात, तर अशी खोटारडी व्यक्ती तुम्ही बरोबर ओळखू शकता त्या गोष्टी कोणत्या आहेत, पाहूया
समोरच्याचे डोळे:
आपण ज्या गोष्टी शब्दात सांगू शकत नाही किंवा सांगायला असमर्थ असतो त्या गोष्टी आपले डोळे सांगत असतात असे म्हणतात. बोलताना जर समोरची व्यक्ती तुमच्या डोळ्यात डोळे घालून न बघता आजूबाजूला बघत असेल तर ती खोटे बोलत असणे शक्य आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे बोलताना डोळे झाकणे. या गोष्टी जर ती व्यक्ती करत असेल तर ती तुमच्याशी खोटे बोलत असावी असे म्हणता येईल.
हातांच्या हालचाली:
जेव्हा एखादी व्यक्ती खोटे बोलत असते तेव्हा तिच्या हाताच्या साधारण हालचाली लगेच ओळखू येण्यासारख्या असतात. बोलताना ती व्यक्ती अस्वस्थ होत असते. बोलताना आपल्या हाताने तोंड किंवा डोळे वारंवार झाकणे ही सगळ्यात जास्त आढळली गेलेली सवय आहे. कुठल्यातरी मार्गाने तुमच्याशी चालू असलेला संवाद लवकरात लवकर कसा संपेल याचाच प्रयत्न ती व्यक्ती करत असते.
शारीरिक हालचाली:
बोलताना विनाकारण शरीराची हालचाल करणे खोटे बोलत असल्याचे लक्षण मानले जाते. गरज नसताना कपडे सावरणे, केसांना हात लावून ते ठीक करणे इत्यादी गोष्टींवर बारीक लक्ष ठेवा. बऱ्याचदा ते कानांना हात लावतात.
त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचे लक्षण म्हणजे विनाकारण ओठ किंवा जीभ चावणे. असाधारण शारीरिक हालचाली असल्या की ती व्यक्ती खोटे बोलत असल्याचा अंदाज बांधायला हरकत नाही.
मौखिक संकेत:
बोलताना थोडे उत्साहित होणे, आवाज वरच्या पट्टीतला असणे या गोष्टींकडे पण लक्ष द्या. अशा वेळी संशय आल्यास एक करा- त्या व्यक्तीला फिरून प्रश्न विचारा. प्रश्न विचारल्यानंतर त्याचे उत्तर काय द्यावे हा विचार करताना जो वेळ लागतो त्या दरम्यान घसा खाकरणे, जांभई देणे असे प्रकार झाले तर ती व्यक्ती तुमच्यापासून काहीतरी लपवत आहे हे नक्की समजा.
दुजोरा देणारी कथा:
व्यक्ती खोटे बोलते तेव्हा त्या असत्याला काहीतरी आधार देण्यासाठी त्याने एखादी कथा आधीच बनवून ठेवलेली असते. त्या गोष्टीबद्दल गरज नसलेली आगाऊ माहिती देणे, कथा रचणे, आपण एखादी गोष्ट करू शकलो नसेल तर त्याला नुसती कारणे देत सुटणे ही खोटे बोलत असल्याची खुण आहे.
हे करताना ती व्यक्ती “आपण किती उघडपणे आणि भीडभाड न ठेवता बोलत आहोत” असे भासवण्याचा प्रयत्न करत असते. खोटे बोलणे ही एक कला आहे. आणि समोरच्याने बोललेले खोटे ओळखणे ही त्याहून सरस कला आहे. असेही गमतीने म्हटले जाते की जी व्यक्ती खोटे बोलत असते त्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीने बोललेले खोटे ओळखायला फारसा वेळ आणि कष्ट लागत नाहीत. कारण आपण खोटे बोलताना जे प्रयोग करतो ते त्या व्यक्तीच्या लक्षात असतात.
खोटे बोलणारी व्यक्ती तुम्हाला त्याच्या शाब्दिक कौशल्याने प्रचंड प्रभावित करू शकते. पण या गोष्टींकडे लक्ष असेल तर समोरची व्यक्ती तुमच्याशी खोटे बोलत आहे हे ओळखायला फारसा वेळ लागणार नाही.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Human body language tricks to spot a lie article news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News