22 November 2024 11:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

इंजिनिअर व्हायचंय पण इंग्रजीचं टेन्शन? | काळजी नको, आता मराठी भाषेतून अभियांत्रिकी शिक्षण मिळणार

Engineering in Marathi Language

मुंबई, ३० जून | विद्यार्थ्यांसाठी आणि तीही विशेष करून ग्रामीण भागातील तरुण आणि तरुणांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या निर्णयानुसार भारतातील प्रादेशिक भाषेतून अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचं शिक्षण देण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाची परवानगी मिळाल्यानंतर मातृभाषेतून अभियांत्रिकी शिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठ आणि पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्या टप्प्यात या अभ्यासक्रमांची सुरुवात होणार आहे. मुंबई विद्यापीठानं मंगळवारी झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला.

पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मुंबई विद्यापीठानं देखील मराठी भाषेतून अभ्यासक्रम सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. मंगळवारी मुंबई विद्यापीठाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्येही मराठीतून अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे.

अखिल बारतीय तंत्रशिक्षण परिषदेनं पहिल्या टप्प्यात आठ प्रादेशिक भाषांमधून अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम सुरु करण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये मराठी, हिंदी, तामीळ, तेलुगु, गुजराती, कन्नड, मल्याळम या भाषांचा समावेश आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Maharashtra state students now study engineering in Marathi Language at Mumbai University and Pune news updates.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x