22 November 2024 10:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS
x

Health First | हिरड्यांच्या दुखण्यापासून लगेच मिळेल आराम | वाचा हे घरगुती उपाय

Home remedies on gums pain

मुंबई, ३० जून | अनहेल्दी खाणं, दातांची योग्य स्वच्छता न राखणं किंवा स्मोकिंग या कारणांमुळे आपल्या हिरड्या खराब होतात. वेळेवर यावर उपचार केले गेले नाही तर हिरड्यांचं दुखणं वाढतं आणि मग त्यावर सूजही येते. हिरड्या कमकुवत झाल्या तर दात सुद्धा कमकुवत होतात. जर अचानक हिरड्यांमध्ये दुखणं सुरू झालं आणि आपल्याजवळ कुठलंही औषध उपलब्ध नाही, अशावेळी काही घरगुती उपाय केले तर आपल्याला दुखण्यावर लगेच आराम मिळू शकतो. त्यामुळे हिरड्या सुद्धा मजबूत होतात. जाणून घ्या हिरड्या आणि दातांमध्ये दुखणं सुरू झाल्यावर करावेत हे घरगुती उपाय..

लिंबू:
एक चर्तुथांश लिंबाचा रस एका वाटीत काढून घ्या. यानंतर लिंबाच्या रसात हिंग मिसळून चांगलं मिश्रण तयार करा. आता या घोळामध्ये कापसाचे तुकडे भिजवा. भिजवलेल्या कापसाचे तुकडे दुखत असलेल्या ठिकाणी दात आणि हिरड्यांवर लावा. या दरम्यान तोंडातून निघालेली लाळ बाहेर काढत राहा. काही वेळातच आपल्याला या दु:खातून आराम मिळेल.

हिंग:
पोटाच्या समस्यांसोबत हिंगाचे इतरही खूप उपयोग आहेत. यासाठी एक ग्लास पाण्यात दोन ते तीन चिमुटभर हिंग आणि सेंधव मीठ टाकून हे मिश्रण गरम करावं. जेव्हा हे पाणी कोमट होईल तेव्हा त्या पाण्यानं गुराळे करावे आणि काही वेळ तोंडात ठेवून पाणी थुंकावं. कोमट पाण्यामुळे सूज कमी होते आणि हिंग आणि सेंधव मीठ दु:खातून आराम देण्यात मदत करतात.

लवंग:
दात किंवा हिरड्यांमध्ये होणाऱ्या दुखण्यापासून सुटका मिळविण्यासाठी एक लवंग खूप चांगला पर्याय आहे. हिरड्यांमध्ये दुखणं सुरू झालं की, लगेच लवंग त्यावर ठेवली तर आराम मिळतो. लवंगमध्ये अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी-उन्फ्लामेट्री गुण असतात, जे तोंडातील किड्यांना मारण्याचं काम करतात. याशिवाय आपण दातांमध्ये लवंग दावून ठेवावी, त्यामुळे दुखणं कमी होतं. तर लवंगच्या तेलाचा पण आपण वापर करू शकतो. यासाठी आपण लवंगच्या तेलामध्ये कापसाचा तुकडा बुडवून आपण दातांवर लावावा. यामुळे आपल्याला काही वेळातच आराम मिळतो.

कांदा:
भाजी किंवा सलादच्या रूपात आपण नेहमी कांदा खातो. मात्र आपल्याला माहितीय का? हिरड्या किंवा दातांच्या दुखण्यावर पण कांदा उपयुक्त ठरतो. यासाठी कांद्याचे लहान तुकडे चिरून ते आपल्या दातांवर ठेवावेत, जिथे दुखणं आहे. जर आपण कांदाच्या तुकडे ठेवू शकत नसाल तर त्याचा रस काढू शकता. यासाठी कापसाचा तुकडा कांद्याच्या रसात बुडवून आपण दुखण्याच्या ठिकाणी ठेवावा. यामुळे आपल्याला दातांच्या दुखण्यापासून आराम मिळतो.

लसूण:
दात आणि हिरड्यांमध्ये होणाऱ्या दुखण्यातून सुटका करून घ्यायची असेल तर लसूण पण एक चांगला पर्याय आहे. यासाठी आपण लसणाची पाकळी सोलून घ्यावी आणि दुखत असलेल्या ठिकाणी ठेवावीत. यासोबतच हळुहळू लसणाची पाकळी चावत जावी. दातांमध्ये लसणाचा रस गेल्यानं दुखणं कमी होतं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Health Article Disclaimer: आरोग्य विषयक आर्टिकलमध्ये दिलेले उपाय हे सामान्य मार्गदर्शन आणि माहिती आहे. याचा उपयोग करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

News Title: Home remedies on gums pain health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x