22 November 2024 11:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

Health First | रात्री डाळ खाणे चुकीचे आहे काय? | वाचा सविस्तर सत्य

Pulses Daal health

मुंबई, ३० जून | आरोग्यासाठी फायदेशीर अशा सर्व घटकांनी युक्त आहार डाळींशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळेच चांगल्या आहारासाठी आपल्या आहारात डाळीचा समावेश खूप महत्वाचा असतो. रोजच्या जेवणात डाळ हा घटक असायलाच हवा. डाळीया प्रोटीनचा मोठा स्रोत असतात आणि पचायलाही खूप सोप्या असतात. एक कप डाळ खाल्ल्याने १८ ग्रॅम प्रोटीन आपल्या शरीराला मिळते. डाळींमध्ये भरपूर प्रमाणात लोह, मॅग्नेशिअम आणि झिंक आढळते. एक कप डाळीतून शरीराला एका दिवसासाठी लागणाऱ्या लोहाची गरज पूर्णपणे भरून निघू शकते.

डाळ खाणे शरीरासाठी खूप लाभदायक:
डाळ खाण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे त्याने आपल्या शरीराला लागणारे जवळपास सर्व घटक एकत्र मिळतात. हे आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असतात. डाळीने आपल्या शरीराचे वजन वाढने थांबते आणि कफ आणि पित्तासारख्या समस्यांनाही दूर ठेवायला ती मदत करते. डाळीने रक्तातील सर्व विकार दूर होतात आणि त्यामुळे त्वचेच्या सर्व समस्यांपासून आपणास सुटका मिळते.

डाळी आरोग्यासाठी फायदेशीर:
मसुराची डाळ ही पचनासाठी एकदम हलकी आणि पौष्‍ट‍िक असते. तुरीच्या डाळींने तुम्ही डायबिटीज २, कँसर, ह्रदयाचे विकार दूर ठेऊ शकता. डाळी तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि त्यामुळे आपल्याला होणारे सर्दी, ताप, खोकला यांसारखे साधे वाटणारे पण गंभीर स्वरूप घेणारे आजार आपल्यापासून दूर राहतात.

डाळ रात्रीच्या वेळी खाणे योग्य आहे का?
काही लोकांचे असे मत असते की रात्रीच्या वेळी डाळ खाल्ल्याने ती पचत नाही आणि त्यामुळे पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. आयुर्वेदात जेवणासंबंधीत नियम बनवण्यासाठी त्या व्यक्तीच्या प्रकृतीकडे म्हणजेच दोषाकडे लक्ष दिले जाते. त्यामुळे आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या प्रकृतीवर म्हणजेच वात, पित्त आणि कफ यांवर होतो.

प्रत्येक धान्याचे गुणधर्म वेगवेगळे असतात आणि त्याचा शरीरावरील प्रभावही त्यानुसार बदलत जातो. तज्ञांच्या मतानुसार रात्र डाळ खाल्ल्याने काही नुकसान होत नाही. परंतु, यावेळी ज्या डाळी पचायला सोप्या आहेत अशा डाळींचा वापर करणे जास्त फायद्याचे ठरते. रात्रीसुद्धा अवेळी डाळ खाल्ल्याने अपचन होऊ शकते आणि त्यामुळे पित्ताचा त्रास संभवतो.

तूरीची डाळ , हरभऱ्याची डाळ आणि वटाण्यची डाळ पचन्य़ासाठी जड असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी या डाळी खाणे टाळावे. याउलट रात्रीच्या जेवणात मुगाच्या किंवा उडदाच्या डाळीचा वापर तुम्ही करू शकता. त्यामुळे रात्रीच्या वेळी केवळ डाळच नाही तर पचनासाठी जड असणारे सर्वच पदार्थ खाणे टाळले पाहिजे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Health Article Disclaimer: आरोग्य विषयक आर्टिकलमध्ये दिलेले उपाय हे सामान्य मार्गदर्शन आणि माहिती आहे. याचा उपयोग करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

News Title: See at the right time to eat pulses Daal health news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x