28 December 2024 1:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअरवर ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: BEL Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 55 टक्केपर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर ब्रेकआऊट देणार. तज्ज्ञांनी दिले तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC Suzlon Share Price | सुझलॉन शेअर टॉप लेव्हलवरून 25% घसरला, आता 100 रुपयांच्या पार जाणार - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS NBCC Share Price | एनबीसीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: NBCC
x

Health First | शेंगदाण्याचे बटर खा, कोलेस्टेरॉलची चिंता विसरा - नक्की वाचा

Peanut butter beneficial

मुंबई, ०१ जुलै | वाढते वजन आणि हृदयाशी संबंधित कोणताही विकार जडला तर डॉक्टर सर्वात आधी खाण्यापिण्याच्या सवयी आणि आवडीनिवडींची चौकशी करतात. फास्टफूड, जंकफूड, तेलात तळलेले पदार्थ, मैदा, बेकरी प्रॉडक्ट, फ्रीझर आणि डीप फ्रीझरमधील थंड पदार्थ तसेच बटर आणि चीज खाऊ नका असा सल्ला देतात. पण एक बटर आहे जे खाण्यासाठी डॉक्टरांचा विरोध दिसत नाही. अनेकदा या एकाच बटरला डॉक्टरांकडून विरोध होत नाही. नियमितपणे पण मर्यादीत प्रमाणात हे एक बटर खाण्यास डॉक्टर हरकत घेत नाहीत. आश्चर्य वाटले असेल वाचून. पण असे बटर आहे. हे आहे शेंगदाण्याचे बटर. इंग्रजी भाषेत याला पीनट बटर असे म्हणतात.

शेंगदाण्यापासून तयार केलेले पीनट बटर रक्तवाहिन्यांमध्ये ‘बॅड कोलेस्टेरॉल’च्या रुपात साठून राहात नाही. ते रक्ताच्या वहनातील अडथळा ठरत नाही. पीनट बटर रक्तवाहिन्यांसाठी पोषक असते. ते रक्तवाहिन्यांची लवचिकता दीर्घकाळ कायम राखण्यास मदत करते. यामुळे हृदयाशी संबंधित विकारांचा धोका कमी होण्यास मदत होते.

जगात अस्तित्वात असलेल्या सर्व प्रकारच्या बटरपैकी पीनट बटरमध्ये सर्वात कमी फॅट्स असतात. महत्त्वाचे म्हणजे हे फॅट्स रक्तवाहिन्यांमध्ये साठून राहणारे फॅट्स नसतात. याच कारणामुळे डॉक्टर पीनट बटर खाण्यासाठी विरोध करत नाहीत पण इतर बटर खाणे टाळा असा सल्ला देतात.

पीनट बटरमधील फॅट्स शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास तसेच ‘गुड कोलेस्टेरॉल’चे (good cholesterol) प्रमाण वाढवण्यासाठी मदत करतात. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि हृदय व्यवस्थित कार्यरत राहते.

पीनट बटरमध्ये ६० टक्के भाग हा शरीरासाठी लाभदायी असलेल्या पोटॅशिअमचा असतो. हे पोटॅशिअम शरीरातील रक्तप्रवाह आणि हृदयाची धडधड सुरळीत ठेवण्यासाठी लाभदायी आहे. रक्ताची जाडी प्रमाणपेक्षा जास्त वाढली अथवा कमी झाली तर तब्येतीसाठी हानीकारक असते. पीनट बटरचे सेवन नियमित केले तर रक्ताची जाडी सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक पोटॅशिअम शरीराला मिळते. मात्र पीनट बटरचे सेवनही मर्यादीत प्रमाणातच केले पाहिजे. अतिरिक्त प्रमाणात पीनट बटरचे सेवन हानीकारक ठरू शकते. याच कारणामुळे डॉक्टर मर्यादीत प्रमाणातच पीनट बटर खाण्याचा सल्ला देतात.

पीनट बटर म्हणजे चव आणि तब्येतीच्या हितासाठी उपयुक्त घटक यांचा उत्तम संगम आहे. या बटरला चांगली चव आहे. विशेष म्हणजे इतर बटरमुळे शरीराची जशी हानी होऊ शकते तशी हानी पीनट बटरमुळे होत नाही. हे तब्येत उत्तम राखण्यासाठी लाभदायी आहे. मर्यादीत प्रमाणात पीनट बटर खाणाऱ्यांना टाइप टू प्रकारचा मधुमेह होत नाही. रक्तातील साखरेचे प्रमाण मर्यादीत राहते.

शेंगदाण्यापासून तयार केलेल्या पीनट बटरमध्ये ३० टक्के प्रोटीन असते. हे प्रोटीन शरीराची दैनंदिन कामांमुळे झालेली झीज भरुन काढते, अशक्तपणा दूर करते. पीनट बटरमधील प्रोटीन शरीरात अमिनो अॅसिडच्या रुपात त्वचेच्या पेशींची झीज भरुन काढते. यामुळे त्वचा उजळण्यास मदत होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Peanut-butter is beneficial for health news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x