22 November 2024 7:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

अमित शहांच्या मुलाची प्रॉपर्टी १० पटींनी वाढली | पण त्यांची ईडी चौकशी करणार नाही - नाना पटोले संतापले

Nana Patole

मुंबई, ०१ जुलै | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर आता ईडीकडून उर्जामंत्री नितीन राऊत यांची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. नितीन राऊत यांनी अर्थिक गैरव्यवहार केला असल्याची तक्रार ईडीकडे दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार डॉ. तरुण परमार यांनी ईडीकडे केली.

ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि त्यांचे पीए यांनी अर्थिक गैरव्यवहार मोठ्या प्रमाणावर केला, असा आरोप करत, मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत त्यांची चौकशी करावी, अशी मागणी वकील परमार यांनी केली. अवैध गौण खनिज उत्खनन, पोलिसांच्या बदल्या, सरकारी जमिनीवर कब्जा करणे, अशा अनेक तक्रारींची यादी परमार यांनी ईडीकडे दिली आहे. यात मोठा भ्रष्टाचार आणि अर्थिक गैरव्यवहार झाल्याचे सांगण्यात आले आहे.

नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊत हा के.के. पॉवर, ए.के. लॉजिस्टिक्स व बग्गील या कंपन्यांमार्फत वीज विभागासंबंधी कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार कंत्राटामार्फत करीत आहेत. या कंत्राटातील हा गैरव्यवहार ५०० ते ६०० कोटी रुपयांचा आहे, असा आरोपही परमार यांनी केला. या सगळ्या बाबींची चौकशी करण्याची मागणी वकील परमार यांनी केली आहे.

दरम्यान, नितीन राऊतांवर होत असलेल्या आरोपांविषयी देखील नाना पटोले यांनी भाजपाचा समाचार घेतला. “आरोप तर सगळ्यांवरच होतात. नरेंद्र मोदींवर देखील आरोप केले आहेत. प्रधानमंत्री सहाय्यता निधीत झालेल्या भ्रष्टाचारावर मोठ्या प्रमाणावर आरोप झाले आहेत. मग त्यांचीही ईडीची चौकशी व्हावी. लोकांच्या पैशाचा दुरुपयोग करणाऱ्याची नक्कीच चौकशी व्हायला हवी. पण निरपराध लोकांवरही ईडी, सीबीआय लावण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत आहे. अमित शहांच्या मुलाची प्रॉपर्टी १० पटींनी वाढली. पण त्यांची ईडी चौकशी करणार नाही. या तपासयंत्रणांचा दुरुपयोग भाजपा करतेय. त्याचाच परिणाम आपल्याला राज्यात दिसतोय”, असं देखील नाना पटोले यावेळी म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Congress state president Nana Patole on BJP demand ED Inquiry of Nitin Raut targets Amit Shah’s son Jay Shah news updates.

हॅशटॅग्स

#NanaPatole(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x