22 November 2024 1:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

खुशखबर | कुक्कुटपालन पालन योजना सुरु झाली | असा करा अर्ज | शासनाच्या वतीने आवाहन

Kukkut Palan Yojana

मुंबई, ०२ जुलै | कुक्कुटपालन पालन योजना संदर्भात अधिक माहिती जाणून घेवूयात. आदिवासी विकास विभागामार्फत एकात्मिक कुक्कुटपालन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेती करत असतांना शेतकरी बांधवाना शेतीमध्ये नैसर्गिक संकटाचे अनेक धोके पत्करावे लागतात. शेती व्यवसायामध्ये केवळ शेतीवर अवलंबून राहिल्यास अधिक तोटा होण्याची शक्यता असते त्यामुळे शेतीला काहीतरी जोड धंदा असणे आवश्यक आहे. शेतकरी बंधुंनो तुम्ही जर शेतकरी असाल आणि शेती पूरक व्यवसाय करू इच्छित असाल तर शासकीय अनुदानावर आधारित कुक्कुटपालन पालन योजनेचा लाभ घ्या.

खालील कार्यक्षेत्रामध्ये हि कुक्कुटपालन पालन योजना लागू आहे.
शेतकरी बंधुंनो, आदिवासी विकास विभागामार्फत, आदिवासी विकास प्रकल्प नाशिक, राजूर, कळवण, नंदुरबार, तळोदा, धुळे, शहापूर आणि पेण या कार्यक्षेत्रातील आदिवासींच्या स्वयंसहायता बचत गटांसाठी एकात्मिक कुक्कुटपालन योजनेच्या माध्यमातून व्यावसायिक पद्धतीने कुक्कुटपालन व्यवसायासाठी अर्थसहाय्य करण्याच्या उद्दीष्टाने ही कुक्कुटपालन पालन योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी या भागातील आदिवासी बचत गटांनी या योजनेसाठी अर्ज करावे असे आह्वान करण्यात आले आहे.

कुक्कुटपालन पालन योजना बचत गटांचे निकष काय आहेत ते जाणून घ्या:
एकात्मिक कुक्कुटपालन योजनेचा लाभ घेण्यासाठी बचत गटांचे निकष खालील प्रमाणे आहेत.
१) बचत गटातील सर्व सदस्य अनुसूचित जमातीचे असायला हवेत
२) जे बचत गट या योजनेचा लाभ घेऊ इच्छित आहेत त्या बचत गटांचा बँकेत व्यवहार चालू असावा.
३) शासन निर्णयात नमूद असणारी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि बचत गटातील सर्व सदस्यांचे रजिस्टर हमीपत्र हे पूर्ण असावेत.

एकात्मिक कुक्कुटपालन योजनेसाठी किती निधी मिळणार जाणून घ्या:
शेतकरी बंधुंनो एकात्मिक कुक्कुटपालन योजनेद्वारे जे पात्र बचत गट असतील त्यांना शेड बांधकामासाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे त्यासोबतच छोटे पक्षी, पशु खाद्य व आवश्यक साहित्य देखील पुरविले जाणार आहे. कुक्कुटपालन पालन योजना अंतर्गत प्रत्येक लाभार्थी बचत गटाला 5.25 लाख रुपये शासकीय अनुदान मिळणार आहे. त्यासोबतच पक्ष्यांच्या लसीकरण, संगोपन तसेच कुक्कुटपालन व्यवस्थापन कसे करावे या संदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहे. हि सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कुक्कुटपालन व्यवसायातील नामांकित कंपन्यांसोबत करार पद्धतीने योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. एकात्मिक कुक्कुटपालन योजनेच्या अधिक माहितीसाठी व अर्ज दाखल करण्यासाठी संबंधित प्रकल्प कार्यालये यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

कुक्कुटपालन पालन योजना फायद्याची रोजगाराच्या संधी निर्माण होणार:
मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि या बेरोजगारीवर मात करण्यासाठी शेतकरी पुत्रांना शेती पूरक व्यवसाय करणे खूपच आवश्यक आहे. मित्रांनो एकात्मिक कुक्कुटपालन करून ग्रामीण भागातील तरुण वर्ग स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. चिकन व अंडी यांना सध्या चांगला बाजारभाव मिळत आहे त्यामुळे जर तरुण वर्ग कुक्कुटपालन पालन व्यवसायाकडे वळला तर नक्कीच त्यांना या योजनेमुळे रोजगार निर्माण होणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Maharashtra state Kukkut Palan Yojana details with online application news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x