22 November 2024 11:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

Health First | कोथिंबीरीचे आरोग्यदायक फायदे माहित आहेत का? - नक्की वाचा

Benefits of coriander

मुंबई, ०२ जुलै | कोथिंबीर आपल्याला सर्वांना माहिती आहे. कोथिंबीर ही फक्त आपली खाण्याची चव नाही वाढवत तर कोथिंबीरीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हिवाळ्यामध्ये कोथिंबिरीची हिरवी पानं आपल्या जेवणात असल्याने अनेक रोगांपासून दूर राहता येते. कोथींबीरीच्या सुगंधी तेलांमध्ये सीटरोनेलोल तत्व असते. हे एन्टीसेप्टिक असते. यामुळे तोंड आल्यास किंवा तोंडामध्ये जखम झाल्यास फायदेशीर ठरते. या लेखात आपण कोथींबीरीच्या आरोग्यदायी फायद्याच्या विषयी जाणून घेणार आहोत.

कोथिंबीरीचे फायदे:

* कोथिंबिरीची पाने बारीक करून पाण्यामध्ये उकळून घ्यावी. हे पाणी गाळून त्याचे काही थेंब डोळ्यात टाकल्यासडोळ्यातुन पाणी येण्याची समस्या दूर होते.
* कोथिंबीर ताजा ताकात टाकून पिल्याने मळमळ, अपचन, अतिसार आणि आतड्याला आलेली सूज पासून बचाव करता येतो.
* कोथिंबीर शीत गुणात्मक,अग्निदीपक पाचक, तृष्णाशामक आहे. तसेच तिच्या मध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, अ, ब, क जीवनसत्व,पोटॅशियम,प्रथिने,स्निग्धता,तंतुमय व पिष्टमय पदार्थ असतात. या सर्व गुणधर्मामुळे कोथिंबिरीचा आहाराबरोबरच औषधी वनस्पती म्हणून वापर केला जातो.
* शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तसेच शरीराचा थकवा जाऊन उत्साह वाढवण्यासाठी दोन चमचे धने आणि अर्धा इंच आलं एक ग्लास पाण्यात उकडावे व हे पाणी गूळ घालून आटवावे व तयार झालेला देण्याचा चहा घ्यावा. हा चहा प्यायल्याने भूख वाढण्यास मदत होते.
* कोथिंबिरीचा एक चमचा ज्यूस मध्ये थोडी हळद टाकून मुरमांवर लावल्यास ते बरे होतात. कोथिंबीर, हिरवी मिरची, किसलेलं खोबरं आली आलं घालून चटणी खाल्ल्याने अपचनामुळे होणारी पोटदुखीत आराम मिळतो.
* फ्रिज मध्ये ठेवलेली अतिशिळी कोथिंबीर वापरू नये. तिचा स्वाद औषधी गुणधर्म कमी होतात. ताजी कोथिंबीर स्वच्छ धुऊन वापरावी.
* मासिक पाळीत अधिक रक्तस्राव होत असल्यास सहा ग्राम धने, अर्धा लिटर पाण्यात उकळून घ्या. पाणी अर्ध झाल्यानंतर त्यात साखर मिसळून ते गरम पाणी प्या. फायदा होतो तसेच अर्धा ग्लास पाण्यात दोन चमचे धने टाकून पिल्याने पोट दुखी थांबते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Benefits of coriander health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x