22 November 2024 1:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

Special Recipe | घरच्या घरी बनवा स्वादिष्ट ‘गाजर बर्फी’ | पहा रेसिपी

Carrot barfi recipe in Marathi

मुंबई, ०२ जुलै | गाजर हे अत्यंत पौष्टिक समजलं जातं. त्यामुळे साहजिकच त्याचे उत्तम आरोग्यदायी फायदे देखील आहेत. परंतु ते कच्चे खाण्यापेक्षा त्यासंबंधित पदार्थ बनवल्यास मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वच त्याचा आनंद घेऊ शकतात. त्यामुळे आज आपण गाजर बर्फी कशी बनवावी ते पाहुया.

संपूर्ण साहित्य:
* गाजर
* 500 ग्राम क्रीम दुध
* 1 लिटर वेलची
* 5 ते 6 तूप
* 100 ग्राम साखर
* 250 ग्राम किंवा आवश्‍यकतेनुसार
* काजू – 50 ग्राम

संपूर्ण कृती:
* सर्वप्रथम गाजर (carrot barfi) चांगले धूवून घेऊन त्याचा बारीक खीस करून घ्या.
* त्यानंतर वेलची बारीक करून त्याची पावडर करून घ्या आणि काजूचेही बारीक तुकडे करून घ्या.
* एका भांड्यात दुध गरम करायला ठेवा.
* दुध गरम झाले की त्यात गाजराचा खीस टाका व दुध पूर्ण आटेपर्यंत ते शिजू द्या.
* मधून मधून त्या मिश्रणाला ढवळत राहा, जेणेकरून गाजर भांड्याच्या बुडाशी लागणार नाही.

गाजराचे हे मिश्रण चांगले घट्ट झाले की त्यात वेलची पावडर, निम्मे काजूचे काप व तूप टाकून निरंतर ढवळत थोड्यावेळ शिजू द्या. आता त्यात साखर घाला व चांगले एकत्रित करा. साखरेचे पाणी पूर्ण आटेपर्यंत मिश्रणाला निरंतर ढवळत राहा.

दरम्यान एका डिशला थोडेसे तूप लाऊन गुळगुळीत करा. मिश्रण चांगले घट्ट झाले की ते या डिशमध्ये पसरवा व उरलेल्या काजूच्या तुकड्यांनी सजवा. त्यानंतर ते थोडेसे थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. मिश्रण थंड झाले की चाकूच्या मदतीने त्याचे हव्या त्या आकाराचे काप करून वेगळे करा. तुमची गाजर बर्फी तयार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Carrot barfi recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x