उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र स्वतःकडे घेण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल? - सविस्तर वृत्त
मुंबई, ०३ जुलै | राष्ट्रवादीचे अनिल देशमुख, शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांच्या विरोधात ईडीच्या कारवाईचे फास आवळले जात असताना, राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधातील ईडीची ‘फाइल’ तयार होत आहे. राज्य सहकारी बँक घोटाळ्यात अजित पवार यांना क्लीन चिट देणारे तत्कालीन पोलिस महासंचालक परमबीरसिंग हे वाझे-देशमुख प्रकरणानंतर भाजपसोबत गेल्याने, महाविकास आघाडी सरकारविरोधातील घडामोडींना आणखी वेग आल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
विधानसभेच्या अध्यक्षपदावरील रिक्त जागेचा मुद्दा या अधिवेशनात निवडणूक घेऊन निकाली काढण्याच्या “सहमती’वर महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष आले असले तरी महामंडळांच्या नियुक्त्या, आमदार निधीचे असमान वाटप, मनपा निवडणुकीची स्पर्धा या मुद्द्यांवर तिन्ही पक्ष एकमेकांना आजमावत आहेत. सेना व राष्ट्रवादी नेत्यांत सातत्याने होणाऱ्या बैठकांमुळे तर दोन्ही पक्षांमध्ये सारे काही आलबेल नाही, याची खात्रीच पटू लागली आहे. या दोन्ही पक्षांच्या नेत्यांविरोधात ईडीच्या कारवाईचे फास घट्ट करून राज्यात मोठ्या भूकंपाची संधी भारतीय जनता पक्ष शोधत आहे. ‘सरकार ५ वर्षे टिकेल’, असे शरद पवारांनी वारंवार सांगणे, शिवसेनेचे कौतुक करणे हे सगळे त्यातूनच आले आहे.
पश्चिम बंगालमधील मानहानीकारक पराभवानंतर आणि उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाला असा देशभर चर्चेला जाईल असा मुद्दा हवा आहे, त्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जेरीस आणून, हे सरकार पाडायचे, त्यातील एका पक्षाला सोबत घेऊन सरकार स्थापन करायचे, असा हा ‘गेमप्लॅन’ आहे. अत्यंत सावधगिरीने भारतीय जनता पक्ष त्यावर काम करत आहे. त्यादृष्टीने या पावसाळी अधिवेशनासह आगामी पंधरवडा निर्णायक ठरणार आहे. राजधानीत राजकीय हालचालींना विलक्षण वेग आला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष भारतीय जनता पक्षाचा हा डाव उधळून लावतात की त्याला बळी पडतात, एवढाच मुद्दा आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख देशमुख आणि अनिल परब या दोन मंत्र्यांना अटकेच्या दाराशी आणून, अजित पवारांची फाइल तयार करून, याची निर्णायक खेळी खेळली जात असल्याची माहिती आहे. त्यात पश्चिम बंगालमधील यशाचे जनक असलेल्या प्रशांत किशोर यांच्या पवारांसोबतच्या तीन बैठका, भाजप विरोधक यशवंत सिन्हा यांच्या पुढाकाराने पवारांच्या निवासस्थानी झालेली भारतीय जनता पक्ष विरोधकांची बैठक यानंतर महाविकास आघाडीचा प्रयोग बरखास्त करण्यासाठी ईडीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला तातडीचे निमित्त सापडले आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या घरापर्यंत ईडीचे जाळे वाढवून त्यासाठीची व्यूहरचना सुरू झाली आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Does BJP want Maharashtra at any cost before Uttar Pradesh Assembly Election 2022 news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार