22 November 2024 6:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

सरकारी योजना | नाबार्ड डेअरी लोन योजना 2021 ऑनलाईन अर्ज। तरुणांना मोठी संधी

NABARD Dairy loan scheme 2021

मुंबई, ०३ जुलै | मित्रांनो आज आपण नाबार्ड डेअरी कर्ज योजना २०२१ ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये नाबार्ड योजना २०२१ नवे बदल,नाबार्ड डेअरी योजना उद्दिष्ट्य, नाबार्ड डेअरी योजना २०२१ अनुदान आणि लाभ, लाभार्थी पात्रता, कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था, अटी, नाबार्ड योजनेंतर्गत दुग्धशाळा शेतीसाठी विविध योजना, नाबार्ड डेअरी योजना २०२१ ऑनलाइन अर्ज करा, ऑनलाइन अर्ज, दुग्धशाळेसाठी आर्थिक निकष, हेल्पलाईन क्रमांक या सर्व घटकांची माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत.

देशातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारकडून नाबार्ड योजना सुरू केली गेली आहे. नाबार्ड डेअरी योजनेअंतर्गत दुग्ध शाळेची व्यवस्था करण्यासाठी सरकार देशातील ग्रामीण भागातील लोकांना कमी व्याजदराने कर्ज बँकेमार्फत उपलब्ध करुन देते. या योजनेंतर्गत पशुसंवर्धन विभाग सर्व जिल्ह्यात आधुनिक दुग्धशाळेची स्थापना करत आहे.

नाबार्ड योजना २०२१ Updates:
ही योजना योग्य प्रकारे राबविण्यासाठी पशुसंवर्धन व्यतिरिक्त मत्स्यपालना विभागाची मदत घेतली जाणार आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मल सीतारमण जी यांनी कोरोना व्हायरसमुळे देशातील शेतकऱ्यांवर आलेली आपत्ती कमी करण्यासाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी नाबार्ड योजनेंतर्गत नवीन घोषणा केलेली आहे. त्याचा फायदा देशातील ३ कोटी शेतकर्‍यांना देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत हे पैसे सहकारी बँकांच्या माध्यमातून सरकारांना दिले जातील. या योजनेंतर्गत देशातील शेतकऱ्यांना ३०,००० कोटींची अतिरिक्त मदत देण्याचा निर्णय घेण्यात आले आहे. जे नाबार्ड योजनेच्या ९०,००० कोटींच्या व्यतिरिक्त असणारआहे.

नाबार्ड डेअरी फार्मिंग कर्ज योजना उद्दिष्ट्य (Dairy Farming Scheme) 2021:
दुग्ध पालन योजना २०२१ अंतर्गत ग्रामीण भागातील बेरोजगारांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागातील लोक आपला दुग्ध व्यवसाय चालवू शकतील. त्यामुळे रोजगाराच्या अधिक संधी देशात उपलब्ध होणार आहेत. या योजनेंतर्गत दुग्धशाळेच्या स्थापनेस देशातील दुधाचे उत्पादन वाढण्यास प्रोत्साहन देण्यात आले आहे. दुग्ध उत्पादनापासून गाई किंवा म्हशींच्या संगोपनापर्यंत, गायींचे संरक्षण करण्यासाठी, तूप उत्पादनापर्यंत सर्व काही मशीनवर आधारित असेल. देशातील इच्छुक लाभार्थी ज्यांना या नाबार्ड योजने २०२१ चा लाभ घ्यायचा असेल, तर त्यांनी या योजनेसाठी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यावा. सरकार शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी बरीच कामे करीत आहे. त्यापैकी नाबार्ड डेअरी योजना २०२१ एक आहे.

डेअरी फार्मिंग योजनेचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे लोकांना व्याजाशिवाय कर्ज देणे जेणेकरून ते सहजपणे आपला व्यवसाय चालवू शकतील. तसेच दुधाच्या उत्पादनास चालना द्यावी जेणेकरुन आपल्या देशातून बेरोजगारीचे प्रमाणात घट होऊन ग्रामीण भागात नवीन रोजगाराच्या संध्या उपलब्ध होतील.

नाबार्ड डेअरी योजना २०२१ अनुदान आणि लाभ:
* अर्जदार दुग्ध उत्पादनांवर प्रक्रिया करण्यासाठी उपकरणे खरेदी करू शकता.
* जर आपण अशी मशीन विकत घेतली आणि त्याची किंमत १३.२० लाख रुपये झाली तर आपण त्यावरील 25 टक्के भांडवल अनुदान म्हणजेच ३.३० लाख रुपये अनुदान म्हणून मिळवू शकता.जर तुम्ही एससी / एसटी प्रवर्गातून आलात तर * त्यासाठी तुम्हाला ४.४० लाख रुपयांचे अनुदान मिळू शकेल.
* या योजनेत कर्जाची रक्कम बँकेला मंजूर होईल आणि २५ टक्के लाभार्थींकडे जाईल. या योजनेचा लाभ मिळविण्यास इच्छुक व्यक्ती थेट बँकेशी संपर्क साधेल.
* जर तुम्हाला पाचपेक्षा कमी गायींनी दुग्धशाळा सुरू करायची असेल तर तुम्हाला त्यांच्या किंमतीचा पुरावा द्यावा लागेल. ज्या अंतर्गत सरकार ५० टक्के अनुदान देईल आणि उर्वरित ५० टक्के शेतक्यांना स्वतंत्र हप्त्यात बँकेला द्यावे लागतील.
* दुग्ध उद्योजकता विकास योजनेअंतर्गत दुग्ध उत्पादन उत्पादक युनिट सुरू करण्यासाठी या योजनेअंतर्गत अनुदान देय आहे.

नाबार्ड डेअरी Loan फार्मिंग योजनेचे लाभार्थी पात्रता काय?:
* शेतकरी
* असंघटित क्षेत्र
* उद्योजक
* बिगर सरकारी संस्था
* संघटित गट
* कंपन्या

नाबार्ड डेअरी फार्मिंग योजनेंतर्गत कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था (Bank) कोणत्या?:
* राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक
* राज्य सहकारी बँक
* प्रादेशिक बँक
* व्यावसायिक बँक
* अन्य संस्था

दुग्ध उत्पादन करणार्‍या दुग्धशाळेसाठी आर्थिक निकष:
* चांगल्या जातीसाठी एका जनावरांची किंमत – ५०,००० रुपये
* दुधाची किंमत प्रति लिटर – ३२ रुपये
* प्रति किलो हिरव्या चाराची किंमत – २ रुपये
* प्रति किलो सुक्या चाराची किंमत – ५ रुपये
* देखभाल व पशुसंवर्धन खर्च (दर वर्षी) प्रति युनिट – २,००० रुपये
* संतुलित जनावरांच्या चारासाठी प्रतिकिलो किंमत – २० रुपये
* पशुसंवर्धन बांधकामासाठी प्रत्येक चौरस फुटांची किंमत – २५० रुपये
* प्रति बॅग विक्रीतून मिळणारे उत्पन्न – २० रुपये

नाबार्ड डेअरी अनुदान योजनेच्या अटी कोणत्या?
* या योजनेंतर्गत एखाद्या व्यक्तीस सर्व घटकांसाठी मदत मिळू शकते, परंतु तो अर्जदार प्रत्येक घटकासाठी फक्त एकदाच पात्र असेल.
* या योजनेंतर्गत एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना मदत केली जाऊ शकते आणि यासाठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पायाभूत सुविधांसह स्वतंत्र युनिट स्थापित करण्यास मदत दिली जाते. परंतु अशा दोन प्रकल्पांमधील कमीत कमी ५०० मीटर अंतर असले पाहिजे.
* या योजनेंतर्गत एखादी व्यक्ती फक्त एकदाच त्याचा लाभ घेऊ शकेल.

नाबार्ड डेअरी योजना २०२१ ऑफलाइन अर्ज कसा करावा?
* सर्वप्रथम तुम्हाला जिल्ह्यातील नाबार्ड कार्यालयाला भेट भेट देऊन संपर्क करावा लागेल.
* अर्जदाराच्या कर्जाची रक्कम मोठी असल्यास त्या व्यक्तीस त्याचा डेअरी प्रकल्प अहवाल नाबार्ड कार्यालयाकडे द्यावा लागेल.
* पर्णातू जरतुम्हालाएखादे छोटे डेअरी फार्म सुरू करायचे असल्यास, तुम्हाला जवळच्या बँकेत जाऊन माहिती मिळवू शकता.
* बँकेत गेल्यानंतर तुम्हाला सबसिडी फॉर्म भरावा लागेल आणि त्यात या योजनेसाठी अर्ज करावा लागेल.

नाबार्ड डेअरी योजना २०२१ ऑनलाइन अर्ज:
* सर्वप्रथम तुम्हाला नाबार्डच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल (National Bank for Agriculture and Rural Development)
* येथे तुम्हाला मुख्यपृष्ठावरील “Information Centre” पर्यायावर क्लिक करावे लागेल.
* क्लिक केल्यावर नाबार्ड योजना ऑनलाईन अर्ज चे पान तुमच्या समोर उघडेल, खाली दर्शविल्याप्रमाणे: दुग्ध पालन योजना ऑनलाईन अर्ज
* या पानावर तुम्हाला दुग्ध पालन योजना ऑनलाईन अर्ज पीडीएफ पर्यायावर क्लिक करावे लागेल. अर्ज डाउनलोड PDF लिंक खाली देखील दिलेली आहे. तिथूनही तुम्ही तो फॉर्म डाउनलोड करू शकता.
* त्या लिंक क्लिक केल्यावर संबंधित योजना फॉर्म आपल्या समोर उघडेल. येथून आपण फॉर्म डाउनलोड करा आणि सर्व विचारलेल्या माहिती प्रविष्ट करा आणि आवश्यक कागदपत्रे संलग्न करा आणि फॉर्म संबंधित नाबार्ड विभागात सादर करा.

नाबार्ड डेअरी फार्मिंग योजना हेल्पलाईन क्रमांक:
* येथे आम्ही आपल्याला नाबार्ड योजना २०२१ ची सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी तुम्हाला या योजनेसंदर्भात काही अन्य प्रश्न असल्यास किंवा ती जाणून घेऊ इच्छित असल्यास नाबार्ड टोल-फ्री नंबर व मेल आयडी वर संपर्क करून तुम्ही त्याबाबतची महती घेऊ शकता.

* Office Address: Plot C-24, G Block, Bandra Kurla complex, BKC Road, Bandra East, Mumbai, Maharashtra 400051 Helpline Number: (022) 26539895/96/99, Email Id: [email protected]

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: NABARD Dairy loan scheme 2021 online application details news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x