25 November 2024 8:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

फ्रान्समध्ये बडे नेते राफेल घोटाळा चौकशीत अडकले | भारतात खासदार आणि माजी मुख्य न्यायाधीश पुन्हा चर्चेत, पण का?...

नवी दिल्ली, ०३ जुलै | फ्रान्समध्ये राफेल करारावरून चौकशी सुरु करण्यात आलेली आहे. या घटनेमुळे संपूर्ण खळबळ उडाली असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका न्यायाधिशाची नियुक्ती करण्यात आली असल्याचे फ्रान्सच्या पीएनएफने (पब्लिक प्रॉसिक्यूशन सर्विसेज) सांगितले आहे. त्यामुळे आता फ्रान्सच्या आजी माजी पंतप्रधानांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. फ्रेंच माध्यमाच्या माहितीनुसार, या करारात भ्रष्ट्राचारावितिरिक्त पक्षपात करण्याच्या आरोपांचीदेखील चौकशी करण्यात येणार असल्याचे पीएनपीने म्हटले आहे.

मात्र आता भारतात वेगळीच चर्चा रंगली आहे आणि इथल्या पत्रकारांमध्ये च. गोगोईंनी ३ ऑक्टोबर २०१८ रोजी सरन्यायाधीश पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यानंतर जवळपास १३ महिने त्यांनी सरन्यायाधीश म्हणून काम केलं होते. विशेष म्हणजे त्यांच्याच काळात राफेल प्रकरणात मोदी सरकारला क्लीनचिट मिळण्याचा निर्णय झालं, तसेच राम मंदिर उभारण्याचा निर्णय देखील त्यांनी स्वतःचा कार्यकाळ संपण्याच्या १-२ दिवस आधी दिला होता.

त्यानंतर पत्रकार तसेच राजकीय नेत्यांकडून यावर टीका करण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी ट्विट करत केंद्रीय मंत्री निती गडकरी आणि दिवंगत नेते अरुण जेटली यांच्या एका जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली होती. यामध्ये त्यांनी, ‘निवृत्तीनंतर काम मिळवण्याच्या नादात न्यायपालिकेचं स्वातंत्र्य प्रभावित होत असल्याचं’ म्हटलं होतं.

धक्कादायक म्हणजे मोदी सरकारने त्याच निवृत्त माजी मुख्य न्यायाधीशांना राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून राज्यसभेचे पाठवलं आणि देशात सर्वच बाजूनी टीका सुरु झाली होती. राफेल घोटाळ्याची सुप्रीम कोर्टात सुनावणी करताना त्यापूर्वी केंद्राकडून काही महत्वाची कागदपत्र बंद लिफाफ्यात मागवली होती जी निकालानंतरही बंदच राहिली. मात्र आता याच विषयांची दुसरी बाजू म्हणजे फ्रान्समध्ये आता तिथले तत्कालीन पंतप्रधान आणि अर्थमंत्री चौकशीच्या फेऱ्यात अडलकल्याने मोदी सरकार सहित स्वतः तत्कालीन सीजेआय देखील पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता नाकारता येतं नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Former CJI Ranjan Gogoi again came in picture after investigation started in France over Rafael Deal news updates.

हॅशटॅग्स

#RafaelDeal(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x