19 April 2025 6:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

WHO चा इशारा | डेल्टाचा स्ट्रेन सतत बदलत असल्याने जग अत्यंत धोकादायक स्थितीत

Delta plus variant

जिन्हिवा, ०३ जुलै | कोरोनाचा डेल्टा स्ट्रेन अत्यंत संसर्गजन्य होत असल्याने जग हे अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. हा डेल्टा कोरोना सतत बदलत असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रायसस यांनी दिला आहे. ज्या देशांमध्ये लसीकरण कमी झाले आहे, त्या देशांमध्ये रुग्णालये आणखी भरत असल्याचे भयानक दृश्य दिसत आहे, याकडे आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी पत्रकार परिषदेत लक्ष वेधले.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रायसस म्हणाले, की डेल्टा हा स्ट्रेन अनेक देशांमध्ये वाढला आहे. अजून कोणताही देश या धोक्यापासून दूर नाही. कोरोना सतत बदलत असल्याने सार्वजनिक आरोग्य यंत्रणेला बदलून प्रतिसाद दिला पाहिजे. डेल्टा व्हेरियंट हा 98 हून अधिक देशांमध्ये आढळला आहे

डेल्टा व्हेरियंट हा पहिल्यांदा भारतात आढळला होता. त्यानंतर डेल्टा व्हेरियंट हा 100 हून अधिक देशांमध्ये आढळला आहे. येत्या काही महिन्यात डेल्टा व्हेरियंट हा जगभरात आढळेल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने मागील आठवड्यात दिला होता.

डेल्टा की डेल्टा प्लस घातक?
डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा प्लस अधिक विषाणूयुक्त आहे का? या प्रश्नावर आयसीएमआरचे माजी प्रमुख वैज्ञानिर डॉ. गंगाखेडकर म्हणाले, की ‘आतापर्यंत आम्हाला माहिती आहे, की डेल्टा व्हेरिएंटमध्ये दोन श्रेणीबद्ध म्यूटेशन आढळले आहेत. त्यातील L452R हा एक आहे. या विशिष्ट म्यूटेशनमुळे उच्च संक्रमणाची भर पडते. हे अधिक कार्यक्षम आहे. त्यामुळे हा एका व्यक्तीपासून दुसऱ्याकडे लवकर पसरतो. तर, आणखी एक म्यूटेशन दिसून आला आहे. ज्याला P871R म्हणतात. हा सर्वात गंभीर परिवर्तनांपैकी एक आहे. याने शरीरात प्रवेश केल्यास एस 1 आणि एस 2 प्रथिने तयार होतात”, असे डॉ. गंगाखेडकरांनी म्हटले. साधारणपणे पेशींमध्ये प्रवेश केल्यानंतर हा विषाणू व्यक्तीच्या स्वतःच्या सेल्युलर मशिनरीचा वापर करून अधिक विषाणू तयार करतो, जो मूळ पेशीच्या मृत्यूमुळे फुटतो. त्यामुळे विषाणू मुक्तपणे बाहेर येतो आणि सर्वत्र पसरतो’ असेही गंगाखेडकर म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: WHO chief warns delta variant continuing to evolve and mutate news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#DeltaPlus(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या