13 November 2024 1:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | BHEL शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: BHEL Penny Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय 11 रुपयाचा शेअर, 5 दिवसात दिला 84% परतावा, रोज अप्पर सर्किट - Penny Stocks 2024 Yes Bank Share Price | येस बँक शेअर 20 रुपयांच्या खाली घसरला, स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठे संकेत - NSE: YESBANK Vodafone Idea Share Price | व्होडाफोन-आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA PPO Number Online | तुमच्याकडे PPO नंबर आहे का, अन्यथा तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, असा जाणून घ्या - Marathi News Salary Account Facility | खूप कमी पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात 'या' जबरदस्त मोफत सुविधा, लक्षात ठेवा IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, स्टॉक प्राईस घसरतेय, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB
x

मुलींमध्ये हे 8 गुण असतील तर कसलाही विचार न करता लगेच करा लग्न - नक्की वाचा

8 virtues in girls Men like

मुंबई, ०३ जुलै | भारतीय समाजात लग्नाला अजूनही प्रचंड महत्त्व आहे. मुलाचे किंवा मुलीचे लग्न न झाल्यास किंवा लग्नाला उशीर होत असल्यास लग्नाचा मुलगा/मुलगी , आई-वडिल हे मानसिकदृष्ट्या हताश होतात आणि नातेवाईक, आजूबाजूचे प्रश्न विचारून त्यांना हैराण करतात. पण लग्न ही इतकी सोपी गोष्ट नाही. अजूनही आपल्याकडे लग्न ठरवताना बरेचदा एकदा झालेल्या चहा-पोह्यांवर, एक्-दोनदाच्या झालेल्या ओझरत्या भेटींवर, कुणा मध्यस्थावर किंवा जुजबी चौकशीवर पूर्ण विश्वास ठेवला जातो.

बरेचदा आयुष्यभर बरोबर राहूनही माणसे कळत नाहीत, तर ह्या तुटक भेटी/माहितीच्या आधारावर कशी कळतील? अर्थात लग्न ठरवण्याचा हा ट्रेंड हळूहळू बदलतोय, काही वेळा मुले – मुली स्वतःच लग्न ठरवतात तर काही वेळा चॅटींग/डेटींग करून, ऑनलाईन मॅट्रीमोनीयल वेबसाईट्स द्वारे ठरवतात.

लग्न कसेही ठरवलेले असो, काहीवेळा लग्नांत फसवणूक होते. जोडीदार मानसिक /शारिरिक दृष्ट्या अपंग/कमजोर निघू शकतो. कधी विवाहित असू शकतो. बरेचदा वाईट सवयी/संशयी, तापट स्वभाव असू शकतो. ईंटरनेट वरच्या चॅटिंग/डेटिंग, ऑनलाईन मॅट्रीमोनीयल वेबसाईट्स वरच्या अनेक फसवणुकीच्या प्रकरणांवर आपण बरेचदा बातम्या वाचतो/पाहतो. काही वेळा लग्न झाल्यावर जोडीदार अपेक्षांमध्ये अगदीच बसत नाही हे लक्षात येऊन मानसिक त्रास होतो, त्याची परिणती घटस्फोटातही होते.

१) बुद्धिवान:
सारीच मुलं केवळ मुलींच्या दिसण्यावर भाळतात हे पूर्ण सत्य नाही. सौंदर्य केवळ बाह्य स्वरूप असते. त्याच्यासोबत वैचारिकरित्या मुली किती प्रगल्भ आणि हुशार आहेत या गोष्टीदेखील मुलांना इम्प्रेस करायला मदत करतात. किंबहुना सौंदर्यापेक्षा त्यांची बुद्धी अधिक प्रभावी ठरते.

२) काळजी घेणे:
मुलांना त्यांच्या गर्लफ्रेंडकडून काळजी घेणे पसंत आहे. त्यामुळे केवळ स्वतःचा विचार करणार्या, आत्मकेंद्री मुलींंपेक्षा इतरांचादेखील बरोबरीने विचार करणार्या मुली ‘गर्लफ्रेंड’साठी प्राधान्याने निवडल्या जातात.

३) विश्वास:
जेव्हा मुली त्यांच्या बॉयफ्रेंडकडून विश्वासाची, प्रामाणिकतेची अपेक्षा ठेवतात तेव्हा सहाजिकच मुलींकडूनही ही अपेक्षा मुलंदेखील ठेवतात. मात्र त्यासाठी दोघांनाही नात्यामध्ये प्रामाणिकता आणि विश्वास निर्माण करण्याची गरज आहे.

४) आदर:
कोणतेही नातं हे रबरबॅन्डप्रमाणे असते. ते अधिक ताणले तर तुटणारच. म्हणूनच अहंकार कमी करून समोरच्या व्यक्तीच्या/ साथीदाराच्या भावनांचा आदर करणे आवश्यक आहे.

५) निष्टावाण:
कठीण प्रसंगामध्ये जी तुम्हांला साथ देईल,तुमच्यासोबत भक्कमपणे उभे राहील अशीच व्यक्ती आयुष्यभर तुमच्यासोबत नातं टिकवून ठेवायला मदत करेल.

६) विनोद बुद्धी:
ह्युमर म्हणजे विनोदबुद्धी असणार्या मुली अधिक पसंत केल्या जातात. सतत चिंता करणार्या, कंटाळवाण्या, रडगाणं गाणार्या मुली काही वेळाने मुलांना कंटाळवाण्या वाटतात.

७) जवळीक:
प्रत्येक वेळेस जवळीक गरजेची असतेच असे नाही. परंतू हा मुलींमध्ये ‘एक्स’ फॅक्टर असू शकतो. क्वचित मुलींमध्ये असणारी ही खेळाडूवृत्ती नात्याला अधिक मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरते.

८) संयम:
प्रत्येक नात्यामध्ये चढ उतार हे होतच असतात. केवळ चांगल्या वेळेत तुमच्या सोबत राहणार्या मुली आयुष्यभर टिकून राहू शकत नाहीत. कठीण काळात साथीदारासोबत राहण्यासाठी संयमदेखील गरजेचा असतो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x