22 November 2024 8:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO
x

सेव्हन इलेव्हन क्लब प्रकरणी फडणवीस अडचणीत | समर्थकाला अतिरिक्त चटईक्षेत्र मंजुरी | कोर्टात याचिका

Devendra Fadnavis

मीरा रोड, ०४ जुलै | विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मागील काही काळापासून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात केलेल्या आर्थिक गैव्यवहारावरून आधीच नागपुरातील वकिलाने गंभीर आरोप करतांना न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दुसरीकडे राज्य सरकारने देखील जलयुक्त शिवार योजनेतील गैरव्यवहारावरून एसआयटी नेमली आहे आणि त्यामुळे देखील भविष्यात फडणवीस अडचणीत येऊ शकतात. मात्र आता त्यात अजून एक भर पडली आहे.

भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या कंपनीच्या वादग्रस्त सेव्हन इलेव्हन क्लब प्रकरणी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल झाली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामार्ग नसताना येथे महामार्गचा संदर्भ देत अतिरिक्त चटईक्षेत्र मंजूर केले होते. मुख्यमंत्री कार्यालयास प्रतिवादी करण्यात आल्याने फडणवीस अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त होत आहे .

भारतीय जनता पक्षाचे माझी आमदार नरेंद्र मेहता हे तत्कालीन मुख्यमंत्री व सध्या चे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. फडणवीस हे मुख्यमंत्री तर मेहता हे आमदार असताना मेहतांच्या सेव्हन इलेव्हन हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला नाविकास क्षेत्र व भागशः सीआरझेड , कांदळवन ऱ्हास चे गुन्हे दाखल असताना क्लब व तारांकित हॉटेल साठी २०१८ साली अतिरिक्त एक चटईक्षेत्र मंजूर करण्यात आले. त्यासाठी शासनाच्या राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत एक चटईक्षेत्र देण्याच्या निर्णयाचा आधार घेण्यात आला. वास्तविक सेव्हन इलेव्हन क्लब हा कोणत्याही राष्ट्रीय वा राज्य महामार्गावर नसताना हे अतिरिक्त चटईक्षेत्र मंजूर करण्यात आले.

विकास नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करून महापालिकेने देखील अतिरिक्त चटई क्षेत्र देत बांधकाम परवानगी व भोगवटा दाखला दिला. वास्तविक २०१६ साली देखील अतिरिक्त चटईक्षेत्र नाविकास विभागात मिळावे म्हणून प्रस्ताव दिले होते. परंतु नगर रचना संचालक पुणे यांनी अतिरिक्त चटई क्षेत्र देण्याचा प्रस्ताव फेटाळून लावत विकास नियंत्रण नियमावलीप्रमाणे या ठिकाणी केवळ तळ अधिक एक मजला असे ९.७५ मीटर उंचीची इमारत बांधता येईल असे स्पष्ट केले होते. तसे असताना महापालिकेने बेसमेंट, तळ अधिक ४ मजली इमारत अतिरिक्त चटई क्षेत्रासह बांधण्यास परवानगी दिली.

नियमांचे उल्लंघन केल्याच्या अनेक तक्रारी असून सुद्धा कारवाई ऐवजी पाठीशी घालण्याचे काम महापालिके पासून शासन यंत्रणेने केल्याचे आरोप होत आले आहेत. फय्याज मुल्लाजी यांनी सदरची जनहित याचिका केली असून त्यात मुख्यमंत्री कार्यालय, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, महापालिका, नगर रचनाकार व सेव्हन इलेव्हन हॉटेल कंपनी यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Opposition leader Devendra Fadnavis in Trouble seven hills hotel issue news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x