13 November 2024 1:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | BHEL शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: BHEL Penny Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय 11 रुपयाचा शेअर, 5 दिवसात दिला 84% परतावा, रोज अप्पर सर्किट - Penny Stocks 2024 Yes Bank Share Price | येस बँक शेअर 20 रुपयांच्या खाली घसरला, स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठे संकेत - NSE: YESBANK Vodafone Idea Share Price | व्होडाफोन-आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA PPO Number Online | तुमच्याकडे PPO नंबर आहे का, अन्यथा तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, असा जाणून घ्या - Marathi News Salary Account Facility | खूप कमी पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात 'या' जबरदस्त मोफत सुविधा, लक्षात ठेवा IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, स्टॉक प्राईस घसरतेय, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB
x

सुर्यास्तानंतर या 5 गोष्टीं कुणालाही देऊ नये असं का म्हटलं जातं? - नक्की वाचा

Avoid giving these 5 things to neighbors

मुंबई, ०४ जुलै | मानवी गरजा कधीही संपू शकत नाहीत. त्यांच्यात नेहमीच कशाची न कशाची तरी कमतरता ही नेहमीच असते. तो कधीही पूर्ण समाधानी होऊ शकत नाही. माणसाची इच्छा पूर्ण होताच त्याचा लोभही अजून वाढत जातो. आपला भारत देश हा वेगवेगळ्या धर्मांचा देश आहे. बाकीचे देश आपल्या संस्कार आणि परंपराना मानतात. भारत देश जगभर प्रसिद्ध आहे कारण इथले लोक एकमेकांना मदत करण्यासाठी नेहमीच पुढे असतात. ते नेहमीच एकमेकांच्या आनंद आणि दुःखात सामील असतात. आपला आनंद हा इतरांच्या आनंदातच दिसतो.जेव्हा आपली चहापत्ती किंवा साखर संपते तेव्हा आपण शेजार्‍यांकडे मागण्यासाठी बिलकुल पण लाजत नाही. याच छोट्या छोट्या गोष्टींमधून दिसून येते की आपण भारतीय किती उदार आणि सौख्याने परिपूर्ण आहोत.

आपण बर्‍याचदा पाहिलेच असेल की जेव्हा भारतातील लोक एखाद्याला आपले मानतात तेव्हा ते एकमेकांबरोबर वस्तुंची देवाण-घेवाण करण्यात मागेपुढे पाहत नाहीत. अशी ही व्यवहारीक देवाण घेवाण आपल्या शेजार्‍यां बरोबर आपण सुद्धा करतच असणार. परंतु कदाचित तुम्हाला हे माहिती नाही की सुर्यास्तानंतर काही गोष्टी या कधीही कुणाला द्यायच्या नसतात. या 4 गोष्टींची देवाण घेवाण केल्याने ती देवाण घेवाण आपल्यासाठी नुकसानदायक ठरु शकते, ज्याचे अजूनही काही वाईट परिणाम होऊ शकतात.

ज्योतिषशास्त्रानुसार काही गोष्टींचा सूर्यास्तानंतर कधीही व्यवहार करु नये. असे केल्याने आपल्यावर अनेक संकटे येऊ शकतात. चला तर मित्रांनो, मग आज आपण या पोस्टमध्ये जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांचा सूर्यास्तानंतर होणारा व्यवहार तुमच्या साठी कसा योग्य नाहीए..

पैसा:
मित्रांनो, संपत्ती मानवासाठी खूप महत्वाची असते. पैशांशिवाय या जगात जगणे फार कठीण आहे. जगातील फक्त असे लोक यशस्वी समजले जातात ज्यांच्याकडे पैसा आहे. धनाची देवी माता लक्ष्मी आहे आणि जेव्हा मनापासून त्यांची उपासना केली जाते तेव्हा त्या आपल्याला यश आणि वैभवाचा आशीर्वाद देतात. परंतु हिंदू धर्माच्या अनुसार सूर्यास्तानंतर पैशांचा व्यवहार करणे अशुभ मानले गेले आहे. असे म्हणतात की यावेळी पैशांचे व्यवहार करणे म्हणजे आपण माता लक्ष्मींचा अपमान करण्यासारखे आहे. असे केल्याने आई लक्ष्मी कधीच घरात प्रवेश करत नाही आणि त्या घरावर आर्थिक संकट येतात. अशा घरात पैशांची चणचण भासायला लागते.

दही:
सुर्यास्ता नंतर दही दिल्याने घरात पैशांची कमतरता भासत राहते. असे म्हणतात की दही शुक्राशी संबंधित आहे. आणि शुक्र हा सुख आणि संपत्तीचा कारक मानला जातो. म्हणूनच असे म्हटले जाते की एखाद्याने सूर्यास्ताच्या वेळी कुणालाही दही देऊ नये, यामुळे आपल्या घरातील आनंद आणि संपत्ती कमी होते.

झाडू:
घराच्या स्वच्छतेसाठी झाडू एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक गरज आहे. पण झाडू फक्त साफसफाईसाठीच वापरला जात नाही तर झाडूला माता लक्ष्मींचे एक प्रतीक मानलं जाते. जुन्या काळातील वडिलधाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, झाडू उभा ठेवणे सुद्धा अशुभ आहे. लक्षात ठेवा की ऐन सूर्यास्ताच्या वेळी झाडू कुणालाही देऊ नये किंवा घेऊही नये. हे अशुभ मानले गेले आहे आणि असे केल्याने घरात संपत्ती येत नाही.

दूध:
पौष्टिक घटकांमुळे मानवी शरीर निरोगी राहते. शरीरातील परिपूर्णतेसाठी दूध हे सर्वोत्कृष्ट मानले जाते. याशिवाय दूध हे शुक्र ग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि असे म्हणतात की सूर्यास्तानंतर एखाद्याला दूध दिल्यास मानसिक चिंता वाढतात. म्हणूनच, संध्याकाळी कुणालाही आपल्या घरातून दूध द्यायचे टाळावे.

हळद:
भाजीची चव आणि रंग वाढविण्यासाठी हळद वापरली जाते. हळद जवळजवळ प्रत्येक शुभ कामात देखील वापरली जाते. हिंदू धर्मात हळदीचा थेट संबंध बृहस्पति ग्रहाशी आहे. बृहस्पति ग्रह नशिबाचा सूचक आहे, म्हणून सूर्यास्ताच्या वेळी हळदीचा व्यवहार करणे आपल्या दुर्दैवाच कारण बनू शकतो. म्हणून कुणालाही सुर्यास्तानंतर हळद देण्याचे टाळावे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x