13 November 2024 1:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | BHEL शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: BHEL Penny Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय 11 रुपयाचा शेअर, 5 दिवसात दिला 84% परतावा, रोज अप्पर सर्किट - Penny Stocks 2024 Yes Bank Share Price | येस बँक शेअर 20 रुपयांच्या खाली घसरला, स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठे संकेत - NSE: YESBANK Vodafone Idea Share Price | व्होडाफोन-आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA PPO Number Online | तुमच्याकडे PPO नंबर आहे का, अन्यथा तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, असा जाणून घ्या - Marathi News Salary Account Facility | खूप कमी पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात 'या' जबरदस्त मोफत सुविधा, लक्षात ठेवा IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, स्टॉक प्राईस घसरतेय, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB
x

कुठल्याही स्त्रीला तिच्या वैयक्तिक गोष्टींमधील 'या' विषयांवर काहीही विचारू नका - नक्की वाचा

Social

मुंबई, ०५ जुलै | तुम्हाला माहीतीय नाराज होणं ही स्त्रियांची सर्वात आवडती सवय आहे. एखाद्याने काहीतरी म्हंटले की लगेच नाराज व्हायचे आणि मग रुसून बसायचे असा स्त्रियांचा स्वभाव असतो. स्त्रिया कधी कोणत्या कारणांवरून नाराज होतील हे सांगता येत नाही. बऱ्याच वेळा आपण त्यांना चांगले बोललो तरीही नाराज आणि वाईट बोललो तरीही त्या नाराजच. पुरुषाने बोललेल्या एखाद्या गोष्टीला त्या कश्याप्रकारे घेतील सांगता येत नाही. आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला अश्या काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही स्त्रियांना कधीच नाही विचारल्या पाहिजे.

पुरुषांनी स्त्रियांना त्यांच्या वयाबद्दल कधीच विचारू नये. जर तुम्ही एखाद्या स्त्रीला तिच्या वयाबद्दल विचारले तर ती तिचे खोटे वय सांगते आणि विचार करते की, माझे वय जास्त तर नाही झाले ना? माझे वय कदाचित जास्त वाटले असेल त्याला म्हणून त्याने मला असा प्रश्न केला. अश्या प्रकारचे विचार करून ती नाराज होते आणि दुःखी होते. स्त्रिया या नेहमी पुरुषांपासून त्यांचे वय लपवत असतात म्हणून पुरुषांनी कधीच त्यांना त्यांचे वय विचारू नये.

कधीही पुरुषांनी स्त्रियांना त्यांच्या शरीरयष्टीवरून चिडवून नये. किंवा कोणत्याही स्त्रीला तिच्या शरीरयष्टी बद्दल काही बोलू नये. बऱ्याच पुरुषांना स्त्रियांना जाडी, लंबू, बुटकी असे बोलण्याची सवय असते. बरेच पुरुष बेधडक स्त्रियांना जाडी, ढोली बोलून जातात. बऱ्याच स्त्रिया लगेच पुरुषांना काही बोलत नाहीत. परंतु पुरुषांच्या अश्या बोलण्याने त्या नाराज होतात, त्यांना दुःख होते. परिणामी नंतर त्या पुरुषाशी बोलने सोडून देतात.

लग्नानंतर बहुतांश पतीदेवांना आपल्या पत्नीच्या भूतकाळाबद्दल माहिती मिळवायची असते. तिचा कोणी बॉयफ्रेंड होता का? तिचे कोणाबरोबर प्रेमसंबंध होते का? अश्या विचारांमुळे बरेच पती थेट आपल्या पत्नीला तिचा कोणी प्रियकर होता का असे विचारतात आणि अश्या प्रश्नांमुळे स्त्रियांना वाटते की, हा माझ्यावर संशय घेत आहे. बऱ्याच स्त्रिया पतीदेवांना प्रतिप्रश्न करतात तर काही तश्याच नाराज आणि दुःखी होऊन बसतात. त्यामुळे पुरुषांनी कधीच स्त्रियांना त्यांच्या जुन्या प्रेमाविषयी विचारू नये.

बऱ्याच पुरुषांना आपल्या पत्नीवर देखरेख ठेवण्याची सवय असते. ती कुठे जाते? काय करते? ऑफीमधून थेट घरीच येते का? अश्या विविध गोष्टींबाबतीत पतीदेव पत्नीवर देखरेख ठेवून असतात. जेंव्हा केंव्हा पत्नी इतर मैत्रीण किंवा दुसऱ्या कोणत्या पुरुषाबरोबर बाहेर फिरताना दिसते तेंव्हा ते तिला तिथेच जाब विचारतात आणि अश्या कारणांमुळे ती नाराज होते. म्हणून पुरुषांनी स्त्रियांना लगेच इतरांसमोर जाब विचारू नये. अश्या गोष्टींविषयी तिला एकांतात बोलावे.

काही पुरुषांची संशयखोर वृत्ती असते. असे संशयी पुरुष कोणालाही आवडत नसतात. संशयी पुरुषाची बायको बनणे म्हणजे एक प्रकारची जोखिमच आहे. कारण संशयी पुरुष कधी कोणत्या स्त्रीवर म्हणजेच तिच्या चारित्र्यावर संशय घेईल सांगता येत नाही. बऱ्याच पुरुषांना सवय असते, तू ह्यालाच का बोलली? तू त्यालाच का बोलली? असे म्हणण्याची. आणि परत ते त्यांच्या पत्नीला बाजवूनही सांगत असतात की, कोणत्याही परपुरुषाशी बोललेलं मला आवडणार नाही. पुरुषांच्या अश्या स्वभावामुळे स्त्रिया नाराज होतात. त्यामुळे पुरुषांनी स्त्रियांवर संशय घेणे बंद केले पाहिजे.

काही पुरुषांना एक वाईट सवय असते ती म्हणजे एखाद्या स्त्रीमधली एखादी कमी तिला जाणवून द्यायचे आणि तिला दुःखी करायचे. जसे की, तू ऑफिसला ऑटोने येते का? तुझ्याकडे गाडी नाहीये? तू आज दुसऱ्या रंगाचा टॉप घालायला पाहिजे होता. तुला कानातले रिंग्स चांगले नाही वाटत. तू आजपासून मोठ्याने बोलायला शिक. अश्याप्रकारच्या बोलण्यामुळे स्त्रिया नाराज होतात त्यामुळे पुरुषांनी स्त्रियांशी अश्या गोष्टी बोलू नये.

पुरुषांनी एक गोष्ट कायम ध्यानात ठेवावी ती म्हणजे एका स्त्रीसमोर दुसऱ्या स्त्रीची कधीच स्तुती करू नये. कोणत्याही स्त्रीला तिच्यासमोर दुसऱ्या स्त्रीबद्दल बोललेले चांगले शब्द ऐकू वाटत नाहीत. एका स्त्रीची दुसऱ्या स्त्रीसमोर जर तुम्ही स्तुती करत असाल तर ते बोलणे तिला आवडणार नाही. ऑफीसमधील कामाविषयी स्तुती त्या एखाद्यावेळी खवपुन घेतील परंतु जर तुम्ही दुसऱ्या स्त्रीच्या सौंदर्याविषयी स्तुती करत असाल तर त्यांना ते अजिबात पटणार नाही आणि त्या नाराज होतील. मित्रांनो वरील गोष्टी ध्यानात ठेवा कधीच कोणतीही स्त्री तुमच्याकडून नाराज होणार नाही. आणि लेख आवडला असेल तर आवर्जून शेअर करा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title:

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x