22 November 2024 2:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन ही लोकशाहीची हत्या? | फडणवीस सरकारचा विक्रम १९ आमदारांच्या निलंबनाचा - सविस्तर वृत्त

Mahavikas Aghadi

मुंबई, ०६ जुलै | महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि अंतिम दिवस आहे. पहिल्या दिवशी झालेल्या ऐतिहासिक गदारोळानंतर आणि त्यानंतर भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनानंतर भाजप आज आक्रमक झालेला आहे. राज्यभर भाजपचं आंदोलन सुरु आहे तर विधिमंडळाच्या आतमध्ये पायऱ्यांवरच भाजपने प्रति विधानसभा भरवलीय.

दरम्यान, २२ मार्च २०१७ रोजी तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात अर्थसंकल्पावेळी विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षातील १९ आमदारांचं ३१ डिसेंबरपर्यंत म्हणजे नऊ महिन्यांसाठी निलंबन करण्यात आलं होतं. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव आणि काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांचा समावेश होता. नऊ महिन्यासाठी निलंबन करण्यात आल्याने या आमदारांना पावसाळी अधिवेशनाला मुकावे लागले होते.

त्यावेळी विधानसभेचे अधिवेशन सुरू होताच तत्कालीन संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी या आमदारांचं निलंबन करण्याचा प्रस्ताव मांडला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हा प्रस्ताव मान्य करून १९ गोंधळी आमदारांचं निलंबन केलं होतं. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे १८ मार्चला २०१७ रोजी अर्थसंकल्प मांडत असताना, विरोधी पक्षांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत गदारोळ घातला होता. टाळ वाजवत विरोधकांनी कर्जमाफीसाठी आग्रह धरला होता.

त्यानंतर सभागृहात गोंधळ घालणे, बॅनर फडकावणे, घोषणाबाजी करणे, अवमान करणे, अर्थसंकल्पाच्या प्रती जाळणे, सभागृहाची प्रतिमा मलिन करणे, सभागृहाचे अवमान करणे आदी आरोप ठेवून या आमदारांचं निलंबन करण्यात आलं होते. मात्र आज तेच फडणवीस आणि हरिभाऊ बागडे लोकशाहीची हत्या झाल्याचा कांगावा करू लागल्याने आश्चर्य व्यक्त होताना दिसत आहे.

 

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: When Fadnavis govt was suspended NCP and Congress 19 MLAs in 2017 news updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x